Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावं!

मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावं!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंह यांनी आम आदमी पक्षाच्या (आप) कार्यकर्त्यांना आणि टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर त्यांना 'राज्यसभा सीट सोडा' असा सल्ला देण्यात आल्यानंतर हरभजन यांनी थेट भ्रष्टाचार आणि पैशांच्या व्यवहारांवर गंभीर आरोप करत वातावरण तापवलं आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका यूजरने हरभजन सिंह यांच्यावर टीका करत लिहिलं,

'ज्या नेत्याला तुम्ही रोज शिव्या देता, त्याच नेत्याने तुम्हाला राज्यसभा सीट दिली होती. मग त्या जागेचा राजीनामा का देत नाही?'

यासोबतच त्या यूजरने हरभजन यांना 'गद्दार' असंही म्हटलं.

या टीकेला प्रत्युत्तर देताना हरभजन सिंह यांनी ती पोस्ट शेअर करत स्पष्ट इशारा दिला. त्यांनी लिहिलं,

'योग्य वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं जाईल. मी कुठल्याही नेत्याचा अपमान केलेला नाही. पण मला गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आपल्या नेत्यांना विचारावं की पंजाबची राज्यसभा सीट किती पैशांत विकली गेली होती.'

हरभजन यांनी पुढे आणखी गंभीर आरोप करत म्हटलं,

'जर त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही, तर मी सांगेन कुणाला किती लाच मिळाली आणि कुणाकडून मिळाली. पंजाबला लुटण्यासाठी काहींना मंत्री आणि चौकीदार बनवलं गेलं.'

दरम्यान, हरभजन सिंह यांना आम आदमी पक्षाने पंजाबमधून राज्यसभेत पाठवलं होतं. मात्र, अलीकडे राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील ७ खासदार भाजपमध्ये गेल्यानंतर पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.

याच पार्श्वभूमीवर जालंधरमधील हरभजन यांच्या घराबाहेर 'आप' कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. तसेच पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढून घेतल्याचीही चर्चा आहे.

हरभजन सिंह यांच्या या वक्तव्यामुळे पंजाबच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं असून सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka