Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्रीराम'च्या घोषणा

ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्रीराम'च्या घोषणा

NEWS डंका 2 weeks ago

भाजप समर्थकांनी केली घोषणाबाजी

श्चिम बंगालमध्ये सत्तांतरानंतर शनिवारी कोलकात्यातील कालीघाट परिसरात भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्याकडे जात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर 'जय श्रीराम'च्या घोषणा दिल्या.

हा प्रकार कालीघाटमधील हरीश चटर्जी स्ट्रीटवरील ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर झाला. तृणमूल काँग्रेसच्या निवडणुकीतील पराभवानंतर त्यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्था पूर्वीपेक्षा कमी करण्यात आल्याचे दिसून आले. शनिवारी तेथे मोजके पोलीस कर्मचारी आणि CRPF जवान तैनात होते.

भाजप समर्थक 'चोर ममता' आणि 'जय श्री राम'च्या घोषणा देताना दिसले, त्यांच्यापैकी एकाने पंतप्रधान मोदींचा पूर्णाकृती कटआउटही हातात धरला होता. भाजपचे झेंडे लावलेले समर्थक मोटारसायकल आणि कारमधून ममता बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानाजवळून घोषणाबाजी करत जात होते. घोषणाबाजीनंतर भाजप समर्थक पुढे निघून गेले. याचवेळी तृणमूल काँग्रेसचे काही कार्यकर्तेही ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर जमा झाले आणि त्यांनी 'जय बंगला'च्या घोषणा देत पक्षप्रमुखांना समर्थन दर्शवले. मात्र संपूर्ण घटनाक्रमादरम्यान वातावरण शांत होते आणि कोणतीही अनुचित घटना घडल्याची माहिती समोर आलेली नाही.

अखेर ममतांनी पराभव स्वीकारलाच!

शुभेंदू अधिकारी बनले भाजपचे पहिले मुख्यमंत्री!

९८ वर्षीय माखनलाल यांच्या पायाला मोदींनी केला स्पर्श, दिले आलिंगन…

ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनी एव्हिएशन अभियंते पाकिस्तानमध्ये उपस्थित!

दरम्यान, ब्रिगेड परेड ग्राउंडवर झालेल्या भव्य समारंभात शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, नव्याने निवडून आलेले आमदार आणि हजारो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे १५ वर्षांनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय बदल घडला आहे. २९४ सदस्यीय विधानसभेत भाजपने २०७ जागा जिंकत तृणमूल काँग्रेस सरकारला सत्तेबाहेर केले. २०२१ मध्ये २१५ जागा जिंकणारी तृणमूल काँग्रेस यावेळी ८० जागांवर घसरली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka