Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मॅनहोल मृत्यूप्रकरणी कंत्राटदार, कर्मचाऱ्यांवर गुन्हा, चार अधिकारी निलंबित

मॅनहोल मृत्यूप्रकरणी कंत्राटदार, कर्मचाऱ्यांवर गुन्हा, चार अधिकारी निलंबित

साकीनाका परिसरातील खैराणी रोड येथे नाल्याच्या दुरुस्ती व गाळ काढण्याच्या कामादरम्यान उघड्या ठेवण्यात आलेल्या मॅनहोलमध्ये पडून ६० वर्षीय अस्लम शेख यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने कठोर कारवाई केली आहे.

या प्रकरणी महानगरपालिकेच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी संबंधित कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एल वॉर्डचे सहायक आयुक्त धनाजी हरलेकर, सहायक/उपअभियंता (देखभाल) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (देखभाल) अभिजित चौगुले तसेच सांडपाणी संचालन विभागाचे सहायक अभियंता उत्तम पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

मोजतबा खामेनी वडिलांच्या अंत्यविधीला राहणार गैरहजर

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

किंमत वाढलीच नाही, मग दरकपात कशासाठी?

गुरुवारी दुपारी खैराणी रोडवर पालिकेचे कर्मचारी नाल्याचा गाळ काढण्याचे आणि गटाराची देखभाल करण्याचे काम करत होते. त्यावेळी मॅनहोलचे झाकण उघडे ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तीन कंत्राटी कामगार साफसफाईचे काम करत असताना मोबाईलवर बोलत असलेले अस्लम शेख यांचा उघड्या मॅनहोलमध्ये पाय पडला आणि ते त्यात कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर महानगरपालिकेने सर्व विभागांना तातडीने सुरक्षा उपाय काटेकोरपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. देखभाल किंवा प्रतिष्ठापनाच्या कामादरम्यान प्रत्येक मॅनहोलच्या चारही बाजूंनी बॅरिकेड्स उभारणे बंधनकारक असल्याची सूचना पुन्हा एकदा देण्यात आली आहे.

याशिवाय, आयुक्तांनी सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सातही विभागांचे उपआयुक्त आणि २६ प्रशासकीय प्रभागांच्या सहायक आयुक्तांना पुढील आठ दिवसांत मुंबईतील सर्व मॅनहोलची शंभर टक्के तपासणी करून त्यांच्या सुरक्षिततेची पडताळणी करण्याचे तसेच त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, साकीनाका पोलिसांकडून या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू असून, निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka