कोणी तरी काही तरी छापायचे आणि त्याचा आधार घेत काँग्रेस नेत्यांनी, त्यांच्या पिलावळीने आरोप करायचे, आरोप बुडाशी येताना दिसले की माफी मागून मोकळे व्हायचे.
हे सतत घडताना दिसते आहे. हा यशस्वी पॅटर्न आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या दोन मुलांचे काळ्या पैशाशी कथित कनेक्शन उघड करणारा 'द डी कंपनीज' हा खळबळजनक लेख 'द कारवां' या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झाला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्या लेखाच्या आधारे पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवली. बदनामीचा खटला दाखल झाल्यानंतर माफी मागून मोकळे झाले. आरोपांएवढी माफीची चर्चा होत नाही, त्यामुळे आरोपच लोकांच्या स्मरणात राहतात. राज ठाकरे यांच्यासारखे नेते हेच आरोप उचलतात आणि सभेत खूप मोठा गौप्यस्फोट केल्याचा आव आणतात. नेत्यांच्या थापांचे ते व्हिडिओ समर्थक उचलतात आणि फिरवत बसतात. सध्या 'द इंडियन एक्सप्रेस'च्या बातमीमुळे या पॅटर्नची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आरोप करायचे, खळबळ उडवायची आणि आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर हळूच माफी मागायची आणि मोकळे व्हायचे, ही काँग्रेसच्या नेत्यांची परंपरा आहे. याचे कारण स्पष्ट आहे. आरोपांचे मथळे होतात. माफी आतल्या पानात दोन कॉलम बातमीमध्ये किंवा चौकटीत प्रसिद्ध होते. सध्या 'इंडियन एक्सप्रेस'च्या बातमीने खळबळ उडाली आहे. बातमीत दम नाही हे सिद्ध होईपर्यंत पत्रकार परिषदा होतील, मोर्चे निघतील. आंदोलनाची घोषणा होईल. चॅनलवाल्यांचीही रतीब टाकण्याची सोय होईल. जनतेची जमेल तेवढी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. बातमीत दम नव्हता हे उघड होईपर्यंत पुढची खळबळजनक बातमी येईल.
कोणी तरी काही तरी छापायचे आणि त्याचा आधार घेत काँग्रेस नेत्यांनी, त्यांच्या पिलावळीने आरोप करायचे, आरोप बुडाशी येताना दिसले की माफी मागून मोकळे व्हायचे. हे सतत घडताना दिसते आहे. हा यशस्वी पॅटर्न आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या दोन मुलांचे काळ्या पैशाशी कथित कनेक्शन उघड करणारा 'द डी कंपनीज' हा खळबळजनक लेख 'द कारवां' या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झाला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्या लेखाच्या आधारे पत्रकार परिषद घेऊन आरोपांची राळ उडवली. बदनामीचा खटला दाखल झाल्यानंतर माफी मागून मोकळे झाले. आरोपांएवढी माफीची चर्चा होत नाही, त्यामुळे आरोपच लोकांच्या स्मरणात राहतात. राज ठाकरे यांच्यासारखे नेते हेच आरोप उचलतात आणि सभेत खूप मोठा गौप्यस्फोट केल्याचा आव आणतात. नेत्यांच्या थापांचे ते व्हिडिओ समर्थक उचलतात आणि फिरवत बसतात. सध्या 'द इंडियन एक्सप्रेस'च्या बातमीमुळे या पॅटर्नची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आरोप करायचे, खळबळ उडवायची आणि आरोप खोटे आहेत हे सिद्ध झाल्यानंतर हळूच माफी मागायची आणि मोकळे व्हायचे, ही काँग्रेसच्या नेत्यांची परंपरा आहे. याचे कारण स्पष्ट आहे. आरोपांचे मथळे होतात. माफी आतल्या पानात दोन कॉलम बातमीमध्ये किंवा चौकटीत प्रसिद्ध होते. सध्या 'इंडियन एक्सप्रेस'च्या बातमीने खळबळ उडाली आहे. बातमीत दम नाही हे सिद्ध होईपर्यंत पत्रकार परिषदा होतील, मोर्चे निघतील. आंदोलनाची घोषणा होईल. चॅनलवाल्यांचीही रतीब टाकण्याची सोय होईल. जनतेची जमेल तेवढी दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. बातमीत दम नव्हता हे उघड होईपर्यंत पुढची खळबळजनक बातमी येईल.

