Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माफिया अतीक अहमदचा मुलगा अबानचा भीषण अपघातात मृत्यू

माफिया अतीक अहमदचा मुलगा अबानचा भीषण अपघातात मृत्यू

NEWS डंका 2 weeks ago

भावाला भेटून परतताना दुर्घटना

झाशी-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर पूंछ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या भीषण रस्ता अपघातात माफिया आणि माजी खासदार अतीक अहमद याचा धाकटा मुलगा अबान अहमद याचा मृत्यू झाला.

या अपघातात त्याच्या आणखी एका साथीदाराचाही मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अबान अहमद आपल्या काही साथीदारांसह झाशी कारागृहात बंद असलेल्या मोठ्या भावाला अली अहमद याची भेट घेण्यासाठी आला होता. भेटीनंतर परतत असताना पूंछ परिसरात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व जखमींना तातडीने मोठ येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर अबान अहमदला मृत घोषित केले. अपघातात त्याच्या एका साथीदाराचाही मृत्यू झाला. उर्वरित तीन जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळ आणि रुग्णालयात दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुणे विषारी दारू प्रकरणी सूत्रधारासह संपूर्ण टोळीवर मकोका

पश्चिम बंगालमध्ये १,२७९ मशिदींवरून भोंगे हटवले

उपोषण सोडण्यासाठी राहुल गांधींकडून प्रतिसादच मिळाला नाही!

लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल दोषी

अबान अहमद हा माफिया आणि माजी खासदार अतीक अहमद याचा सर्वात धाकटा मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ अली अहमद सध्या झाशी कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या अपघाताची माहिती मिळताच रुग्णालय परिसर आणि संबंधित ठिकाणी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka