Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मातृत्वाचा अपमान चालणार नाही!

मातृत्वाचा अपमान चालणार नाही!

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) ला जोरदार फटकारलं आहे. 'भारतात मातृत्वाचा सन्मान केला जातो' असं स्पष्ट सांगत कोर्टाने WFI च्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

कोर्टाने केंद्र सरकारला निर्देश देत विनेश फोगाटसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास सांगितलं असून, आगामी एशियन गेम्स निवड चाचण्यांमध्ये तिचा सहभाग सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

विनेश फोगाट मातृत्व रजेनंतर पुनरागमन करत आहे. मात्र, WFI ने तिला 'कारण दाखवा नोटीस' पाठवत शिस्तभंग आणि डोपिंगविरोधी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.

यासोबतच WFI ने २६ जून २०२६ पर्यंत विनेशवर कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घातली होती. त्यामुळे ती राष्ट्रीय ओपन रँकिंग स्पर्धेतही खेळू शकली नव्हती.

विनेशने ट्रायलमध्ये सहभागी होण्यासाठी WFI कडे परवानगी मागितली होती, पण तिची मागणी फेटाळण्यात आली.

WFI चं म्हणणं होतं की, वाडाच्या नियम ५.६.१ अंतर्गत विनेशविरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू आहे. या नियमानुसार निवृत्तीनंतर पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्यापूर्वी किमान सहा महिन्यांची नोटीस पूर्ण करणं आवश्यक असतं.

मात्र, दिल्ली हायकोर्टाने WFI च्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत जुन्या निवड निकषांपासून अचानक दूर जाणं अनेक प्रश्न निर्माण करत असल्याचं नमूद केलं.

यानंतर विनेश फोगाटने कोर्टात धाव घेत ३० आणि ३१ मे रोजी होणाऱ्या एशियन गेम्स ट्रायलमध्ये सहभागी होण्याची परवानगी मागितली होती.

पहिल्या सुनावणीत कोर्टाने तातडीचा आदेश देण्यास नकार दिला होता. मात्र आता हायकोर्टाच्या ताज्या निरीक्षणांमुळे विनेशला मोठा दिलासा मिळाला आहे.

या निर्णयानंतर भारतीय क्रीडा वर्तुळात WFI च्या भूमिकेवर तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka