Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मायक्रोसॉफ्ट एनथ्रोपिकच्या मदतीला; ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला

मायक्रोसॉफ्ट एनथ्रोपिकच्या मदतीला; ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटला

NEWS डंका 3 months ago

मेरिकेच्या संरक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाविरोधातील कायदेशीर लढाईत हस्तक्षेप

अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी घडामोड घडली असून मायक्रोसॉफ्ट कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपनी एनथ्रोपिक (Anthropic) च्या समर्थनार्थ न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

कंपनीने अमेरिकेच्या संरक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत हस्तक्षेप केला आहे.

मायक्रोसॉफ्टने सॅन फ्रान्सिस्को येथील न्यायालयाला विनंती केली आहे की, या प्रकरणावर अंतिम निर्णय होईपर्यंत पेंटागनच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती द्यावी. कंपनीचे म्हणणे आहे की, हा आदेश तात्काळ लागू झाल्यास सरकारी कंत्राटदार आणि तंत्रज्ञान पुरवठादारांसाठी मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होऊ शकतात.

एनथ्रोपिक ही क्लाऊड एआय मॉडेल तयार करणारी कंपनी आहे. सोमवारी या कंपनीने न्यायालयात याचिका दाखल करत अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे, ज्यामध्ये तिला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा निर्णय लागू झाल्यास अमेरिकेच्या लष्करी संस्थांकडून तिच्या तंत्रज्ञानाच्या वापरावर मोठे निर्बंध लागू होऊ शकतात.

मायक्रोसॉफ्टने न्यायालयात सांगितले की, या निर्णयाचा थेट परिणाम त्यांच्यावर होऊ शकतो. कारण कंपनीच्या अनेक तांत्रिक सेवा आणि उपाययोजनांमध्ये एनथ्रोपिकची एआय तंत्रज्ञान समाविष्ट आहे, जे ती अमेरिकेच्या लष्करी आणि सरकारी संस्थांना उपलब्ध करून देते. जर हा प्रतिबंध तातडीने लागू झाला, तर अनेक पुरवठादारांना आपली उत्पादने आणि सेवा पुन्हा तयार करावी लागतील, ज्यामुळे मोठा खर्च आणि कार्यप्रणालीतील अडथळे निर्माण होऊ शकतात.

'जर या कारवाईवर तात्काळ स्थगिती दिली नाही, तर मायक्रोसॉफ्ट आणि इतर सरकारी कंत्राटदारांना- जे अमेरिकन सरकारच्या मोहिमांना सहाय्य करणारे तांत्रिक उपाय तयार करण्यात तज्ज्ञ आहेत- आपल्या व्यवसाय नियोजनात नव्या प्रकारच्या जोखमींचा विचार करावा लागेल,' असे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

'मोजतबाला सर्वोच्च नेता बनवू नका!' अली खामेनी यांच्या मृत्युपत्रात काय लिहिले आहे?

होर्मुझ सामुद्रधुनीत किती भारतीय जहाजं अडकली?

टेक्सासमध्ये रिलायन्सच्या गुंतवणुकीसह बांधणार तेल शुद्धीकरण कारखाना

बहरीनमध्ये पाच पाकिस्तानींसह बांगलादेशीला अटक!

कंपनीच्या मते, स्थगिती दिल्यास सर्वांना यावर तोडगा काढण्यासाठी वेळ मिळेल. यामुळे अमेरिकन लष्करी संस्थांना अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर सुरू ठेवता येईल. त्याचवेळी एआयचा वापर देशांतर्गत व्यापक निगराणी किंवा मानवी नियंत्रणाशिवाय युद्ध सुरू करण्यासारख्या उद्देशांसाठी होऊ नये, याचीही खात्री करता येईल. या कायदेशीर लढाईत एनथ्रोपिकला तंत्रज्ञान समुदायातूनही पाठिंबा मिळत आहे. सोमवारी ओपन एआय आणि गुगल येथील ३७ संशोधक आणि अभियंत्यांच्या गटानेही कंपनीच्या समर्थनार्थ न्यायालयाची दारे ठोठावली आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka