Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'मी उद्या इथे असेन की नाही, माहीत नाही'

'मी उद्या इथे असेन की नाही, माहीत नाही'

NEWS डंका 2 weeks ago

चार दिवसांपूर्वीच केलेल्या नाना पाटेकरांच्या विधानाची चर्चा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या शेवटच्या सार्वजनिक कार्यक्रमातील भाषणाची विशेष चर्चा होत आहे.

निधनाच्या अवघ्या चार दिवस आधी, ४ ऑक्टोबर रोजी गोव्यातील डोना पौला येथे आयोजित सम्राट क्लब इंटरनॅशनलच्या स्थापना समारंभाला नाना पाटेकर उपस्थित होते. यावेळी जीवन, माणसाचा उद्देश आणि नश्वरता यावर त्यांनी केलेले भाषण आता चाहत्यांसाठी भावूक करणारे ठरत आहे.

नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात जीवनाच्या अनिश्चिततेचा उल्लेख केला होता. 'आपल्या सर्वांना कधी ना कधी जायचेच आहे. मी उद्या इथे असेन की नाही, हे मला माहीत नाही,' असे ते म्हणाले होते. प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस हा क्षण येणारच आहे, मात्र तो दिवस येण्यापूर्वी आपल्याला जे करायचे आहे, ते करण्याची क्षमता आणि तयारी आपल्यात आहे का, याचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

केवळ कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित न राहता समाजासाठी काहीतरी करण्याची गरज असल्याचेही नाना पाटेकर यांनी अधोरेखित केले. 'माझे जग केवळ माझी मुले, पत्नी आणि घरापुरतेच मर्यादित असेल, तर माझ्या जगण्याचा उद्देश काय? मला या जगाला काहीतरी परत द्यायला हवे,' असा विचार त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी त्यांचे दिवंगत मित्र आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. पर्रीकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी जीवनातील उद्देश आणि समाजासाठी योगदान देण्याच्या महत्त्वावर भाष्य केले.

नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात सार्वजनिक जीवनातील मतभेद आणि नागरी शिष्टाचारावरही भाष्य केले. एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्याविरोधात बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, आपले मत मांडताना किमान सभ्यता आणि योग्य पद्धत पाळली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. 'मला एखादी गोष्ट आवडत नसेल, तर मी त्याबद्दल बोललेच पाहिजे. पण बोलण्याची एक पद्धत असते. सार्वजनिकरित्या बोलताना किमान सभ्यता असायलाच हवी,' असे नाना पाटेकर यांनी म्हटले होते.

पाच दशकांचा अभिनय प्रवास

नाना पाटेकर यांनी १९७८ मध्ये 'गमन' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पुढील पाच दशकांत त्यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत विविध भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 'परिंदा', 'प्रहार', 'क्रांतिवीर' आणि 'अब तक छप्पन' यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या गंभीर आणि प्रभावी भूमिका विशेष गाजल्या. त्याचबरोबर 'वेलकम'सारख्या चित्रपटांमधून त्यांनी विनोदी भूमिकाही तितक्याच प्रभावीपणे साकारल्या. त्यामुळे गंभीर अभिनयापासून विनोदी भूमिकांपर्यंतची मोठी रेंज त्यांच्या कारकिर्दीत पाहायला मिळाली.

पोलिसांना धक्काबुक्की प्रकरणी राहुल गांधींसह प्रियांका गांधींवर एफआयआर

अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील 'नानां'चा अभिनय!

नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

'तेजस'साठी अमेरिकेतून चार इंजिन भारतात दाखल

दरम्यान, ७५ वर्षीय नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी पहाटे गोव्यातील डोना पौला येथील मणिपाल रुग्णालयात निधन झाले. त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka