Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मिचेल स्टार्कला हिरवा कंदील

मिचेल स्टार्कला हिरवा कंदील

NEWS डंका 1 month ago

यपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यास अखेर मंजुरी मिळाली असून तो लवकरच दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात सहभागी होणार आहे.

कोपर आणि खांद्याच्या दुखापतीमुळे आतापर्यंत आयपीएलपासून दूर असलेला स्टार्क आता पुनरागमनासाठी सज्ज आहे. १ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एशेज मालिकेदरम्यान आणि त्यानंतर बिग बॅश लीगमध्ये खेळताना स्टार्कला दुखापत झाली होती. विशेष म्हणजे, एशेजमधील सर्व ५ कसोटी सामने खेळत त्याने 'प्लेयर ऑफ द सीरीज'चा किताब पटकावला होता. मात्र दुखापतीची तीव्रता त्यावेळी पूर्णपणे लक्षात आली नव्हती.

आयपीएलमधून अनुपस्थित राहिल्यामुळे स्टार्कवर सोशल मीडियावर टीका झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना त्याने स्पष्ट केले होते की, तो सध्या दुखापतीतून सावरत असून पुनर्वसन प्रक्रियेत आहे. 'माझ्या शरीराची स्थिती मला अधिक चांगली माहीत आहे. चुकीच्या अंदाजांवर आधारित टीका योग्य नाही,' असे त्याने म्हटले होते.

त्याने चाहत्यांची माफी मागत दिल्ली कॅपिटल्सशी आपली बांधिलकीही व्यक्त केली होती. 'मी संघाशी सातत्याने संपर्कात आहे आणि लवकरच संघात सामील होणार आहे,' असे स्टार्कने सांगितले.

स्टार्कच्या पुनरागमनामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीला मोठी धार मिळणार आहे. सध्या दिल्लीने ६ सामन्यांत ३ विजय आणि ३ पराभवांसह ६ गुण मिळवले असून ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka