Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'मिसिंग लिंक' नाही, तर 'कनेक्टिंग लिंक'!

'मिसिंग लिंक' नाही, तर 'कनेक्टिंग लिंक'!

NEWS डंका 3 weeks ago

फडणवीसांनी अधिकाऱ्यांना दिला संदेश

मुंबई- पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि अभियांत्रिकी क्षमतांचा पुरेपूर वापर करून निर्माण केलेल्या अशा बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे शुक्रवार, १ मे रोजी लोकार्पण झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आता हा प्रकल्प मिसिंग लिंक नसून, कनेक्टिंग लिंक आहे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

१३ किमींच्या या नव्या मार्गिकला मिसिंग लिंक म्हटले जात होते. मात्र, उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मार्गिकेला कनेक्टिंग लिंक म्हणावे, असे आवाहन केले. पुढे कनेक्टिंग मार्गिकची माहिती देताना मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या सरकारवर टीका केली. या मार्गाची कल्पना पहिल्यांदा २०१० साली मांडली गेली. त्यानंतर अन्वेषण होऊन त्याचा अहवाल तयार झाला. मात्र हा मार्ग कसा होऊ शकत नाही, यासाठी आधीच्या सरकारने १३ कारणे दिली. यात एक कारण असेही होते की, लोणावळा तलावाच्या खालून हा मार्ग जात असल्यामुळे तो करता येणार नाही, असेही एक कारण यात दिले गेले. महायुतीचे सरकार आल्यानंतर मी एमएसआरडीसीचे अधिकारी मोपलवार, आनंद कुलकर्णी यांना याबाबतचे कारण विचारले. त्यांनी हा मार्ग होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला. डिसेंबर २०१५ ला जुन्या सरकारचा निर्णय बदलून आम्ही मिसिंग लिंक करणार असल्याचा निर्णय घेतला आणि काम सुरू केले.

प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर या नवीन मार्गावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत प्रवासाचा आनंद लुटला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीत स्वार झाले होते. विशेष म्हणजे, या नव्याकोऱ्या 'मिसिंग लिंक'वर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडीचे सारथ्य करत हा मार्ग प्रवासासाठी खुला केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या कामाची आणि बोगद्यांमधील अद्ययावत यंत्रणेची पाहणीही केली.

'मिसिंग लिंक'ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

६० वर्षांनंतर मिझोराम 'बंडखोरीमुक्त' राज्य

मतमोजणीसाठी केंद्रीय कर्मचारी वैध; ममतांना तडाखा

या नव्या मार्गामुळे आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता निकाली निघणार आहे. मुंबई ते पुणे प्रवासातील वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार आहे. घाटातील अवघड वळणे आणि चढ-उतार टाळून प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. या प्रकल्पात टायगर व्हॅलीवर उभारलेला भव्य केबल-स्टेड पूल आणि जगातील सर्वात रुंद बोगदे हे अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण मानले जात आहेत. तब्बल २३.५ मीटर रुंदीच्या या बोगद्याला जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे. हा बोगदा लोणावळा तलावाच्या तब्बल १८० मीटर खालून खोदण्यात आला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बोगद्याची नोंद झाली आहे आणि या सोहळ्यात याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka