Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोदींच्या 'मेलोडी' गिफ्टचा गोड परिणाम

मोदींच्या 'मेलोडी' गिफ्टचा गोड परिणाम

पार्ले इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार उसळी

टली दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भारतीयांची आवडती 'मेलोडी' टॉफी भेट दिल्यानंतर सोशल मीडियावर या क्षणाची प्रचंड चर्चा रंगली असून त्याचा थेट परिणाम शेअर बाजारातही पाहायला मिळाला.

'मेलोडी' हे नाव पुन्हा एकदा चर्चेत येताच पार्ले इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये अचानक मोठी खरेदी झाली आणि कंपनीच्या शेअरने ५ टक्क्यांपर्यंत उसळी घेत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले.

रोममध्ये झालेल्या अधिकृत भेटीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी जॉर्जिया मेलोनी यांना खास भारतीय गोड पदार्थ आणि 'मेलोडी' टॉफीचे पॅकेट भेट म्हणून दिले. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. जॉर्जिया मेलोनी यांनीही आनंद व्यक्त करत 'व्हेरी गुड टॉफी' अशी प्रतिक्रिया दिल्याने इंटरनेटवर 'मेलोडी' पुन्हा ट्रेंड होऊ लागली. मोदी आणि मेलोनी यांच्या नावांची जोड देत याआधीही सोशल मीडियावर 'मेलोडी' हा शब्द अनेकदा चर्चेत आला होता. त्यामुळे या गिफ्टनंतर सोशल मीडियावर मीम्स, पोस्ट्स आणि प्रतिक्रिया यांचा अक्षरशः पूर आला.

अबब!! ओडिसातील अधिकाऱ्याचे ६८ भूखंड, पाच इमारती, १७ एकरवर फार्म हाऊस

विजय यांच्या बैठकीचा व्हिडिओ व्हायरल; प्रशासनातील 'रील कल्चर'वर प्रश्नचिन्ह

या व्हायरल चर्चेचा परिणाम थेट शेअर बाजारावर झाला. पार्ले इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये अचानक मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली. बाजार उघडल्यानंतर काही वेळातच कंपनीचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटपर्यंत पोहोचला. गेल्या काही महिन्यांपासून दबावात असलेल्या या शेअरमध्ये अचानक आलेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडिया ट्रेंड, चर्चेत आलेले ब्रँड आणि भावनिक जोड यांचा परिणाम अल्पकालीन स्वरूपात शेअर्सवर होताना दिसतो आणि यावेळीही त्याचाच प्रत्यय आला.

विशेष म्हणजे, अधिकृत राजनैतिक चर्चांपेक्षा 'मेलोडी' टॉफीचा हा साधा पण भावनिक क्षणच सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी 'भारतीय टॉफी आता जागतिक पातळीवर पोहोचली' अशा प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी 'पार्लेला यापेक्षा मोठी जाहिरात मिळूच शकत नाही' असे म्हणत आनंद व्यक्त केला. एका छोट्याशा गिफ्टमुळे सोशल मीडिया, ब्रँड व्हॅल्यू आणि शेअर बाजार यांचा अनोखा संगम पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka