Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोहन भागवतांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी!

मोहन भागवतांचे भाषण अत्यंत प्रेरणादायी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विजयादशमीचे भाषण 'अत्यंत प्रेरणादायी' असल्याचे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. भागवत यांनी आपल्या भाषणात देशाची प्रगती, सामाजिक एकता, आत्मनिर्भरता आणि समाजाचे चारित्र्य अधिक मजबूत करण्याची गरज यांसह विविध विषयांवर भाष्य केले, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

मोहन भागवत यांनी सेवा आणि राष्ट्रनिर्माण हे प्रत्येक स्वयंसेवकाच्या कार्याचा अविभाज्य भाग असल्यावरही भर दिल्याचे मोदी यांनी नमूद केले.

'एक्स'वरील पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले, 'शताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे आयोजित श्री विजयादशमी उत्सवात परम पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवतजी यांनी अत्यंत प्रेरणादायी संबोधन केले. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, मोहन भागवत यांनी 'पंच परिवर्तन' या संकल्पनेवरही भाष्य केले आणि त्याद्वारे सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात कशा प्रकारे अर्थपूर्ण योगदान देता येईल, हे स्पष्ट केले.

दीप्तीची सुवर्णधाव; आशियाई विक्रमासह भारताचा डंका

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला

गरब्यात मुस्लीम तरुणाची हुल्लडबाजी; विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीला थप्पड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाच्या सर्व स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, 'आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिनाच्या विशेष प्रसंगी सर्व स्वयंसेवकांना माझ्या शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षांमध्ये संघाला घडवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व महान व्यक्तींना मी आदरांजलीही अर्पण करतो.'

पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सेवा, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय शतकीय वाटचाल पूर्ण केल्याचेही नमूद केले. असंख्य स्वयंसेवकांनी कर्तव्याची खोल भावना आणि राष्ट्र प्रथम या भावनेने समाजासाठी कार्य केले आहे. येणाऱ्या काळातही ही भावना राष्ट्रीय विकासाला अधिक बळ देत राहो, अशी अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka