Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांना मातृशोक

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांना मातृशोक

मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मातोश्री शीतल साटम यांचे प्रदीर्घ आजारपणामुळे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबईच्या महापौर तसेच भाजपाच्या अनेक नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भाजपाचे कांदिवली पूर्वेतील आमदार अतुल भातखळकर यांनी अमित साटम यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी एक्सवर लिहिले आहे की, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या मातोश्री, श्रीमती शीतल यांचे निधन झाले आहे. परमेश्वर त्यांना उत्तम गती प्रदान करो, समस्त साटम कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka