मुंबईत १८ तास पाणीपुरवठा बंद!
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शिवडी परिसरातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे २२ एप्रिल (बुधवार) सकाळी १० ते २३ एप्रिल (गुरुवार) पहाटे ४ या कालावधीत तब्बल १८ तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
या कामाचा परिणाम दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक भागांवर होणार असून नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शिवडीतील हाजी बंदर मार्गावर १५०० मिमी व्यासाचे दोन 'बटरफ्लाय व्हॉल्व' बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मोठा जलविभाजक बंद ठेवावा लागणार असल्याने पाणीपुरवठा थांबवण्यात येणार आहे.
CSMT परिसर, पी. डिमेलो मार्ग, सेंट जॉर्ज रुग्णालय, RBI, नौदल डॉकयार्ड आदी भागात दिवसभर पाणीपुरवठा बंद.
बोरा बाजार, एसबीयूटी क्षेत्र, पाकमोडिया मार्ग, बापू कोटे मार्ग आदी गजबजलेल्या भागात पाणीपुरवठा बंद.
जेजे, नायर, कस्तुरबा रुग्णालयांवरही परिणाम
केईएम, टाटा, वाडिया रुग्णालयांनाही फटका
महानगरपालिकेने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, ऐन उन्हाळ्यातील ही कपात लक्षात घेता सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे.
मुंबईत २२-२३ एप्रिल दरम्यान मोठी पाणी कपात होणार आहे. त्यामुळे 'बादल्या भरून ठेवा!'

