Dailyhunt
मुंबईसह देशभरात बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवणारा अटकेत

मुंबईसह देशभरात बॉम्ब धमकीचे ईमेल पाठवणारा अटकेत

NEWS डंका 1 month ago

पश्चिम बंगालच्या तरुणाला गुजरातमध्ये पकडले

मुंबईतील शाळा, मेट्रो स्थानके आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्ब ठेवण्याच्या बनावट धमक्या देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अखेर शोधून काढले आहे.

पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील २८ वर्षीय सौरव विश्वास याला गुजरातमध्ये अटक करण्यात आली असून दिंडोशी पोलिस आता त्याला ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी गोरेगाव पूर्व आणि एमएचबी कॉलनी परिसरातील शाळांसह काही संस्थांना त्यांच्या आवारात बॉम्ब ठेवल्याचा दावा करणारे ईमेल प्राप्त झाले होते. या ईमेलमुळे मोठी खळबळ उडाली होती. मात्र तपासात ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू करण्यात आला.

तांत्रिक तपास आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे तपासाची दिशा पश्चिम बंगालमधील न्यू बॅरकपूरकडे गेली, जिथे आरोपी सौरव विश्वास राहत होता. मात्र पोलिसांचे पथक तेथे पोहोचण्यापूर्वीच अहमदाबादमध्ये अशाच प्रकारच्या धमकीच्या ईमेल प्रकरणात गुजरात पोलिसांनी त्याला १ मार्च रोजी अटक केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दिंडोशी पोलिसांचे पथक गुजरातला रवाना झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार

'आधी लक्ष्य इराण, नंतर क्युबा!'

सोन्याने पार केली ₹१.६ लाखांची ऐतिहासिक पातळी, चांदीत ₹६,८०० ची वाढ

तपासात असेही समोर आले आहे की, आरोपीने मुंबईसह दिल्ली, गुजरात आणि देशातील इतर शहरांतील शाळा, मेट्रो स्थानके तसेच स्टॉक एक्सचेंजसारख्या महत्त्वाच्या संस्थांना ५० हून अधिक धमकीचे ईमेल पाठवले होते. या ईमेलमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 'आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास केला जाणार आहे. त्यामागील उद्देश आणि इतर कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी सुरू आहे,' अशी माहिती दिंडोशी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka