Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिककरांसाठी हक्काच्या घराची मोठी संधी

नाशिककरांसाठी हक्काच्या घराची मोठी संधी

NEWS डंका 1 month ago

म्हाडाच्या ७४४ घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने ७४४ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीकृत सोडत जाहीर केली असून, ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज स्वीकृती प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.

या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४१२ सदनिका, तर म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ३३२ सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

नाशिक मंडळाचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या हस्ते 'गो-लाईव्ह' कार्यक्रमातून अर्ज प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी इच्छुक नागरिकांना केवळ म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा अधिकृत मोबाईल अॅपद्वारेच अर्ज करण्याचे आवाहन केले. सोडत प्रक्रियेसाठी कोणत्याही एजंट, प्रतिनिधी किंवा सल्लागाराची नियुक्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी अशा व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डाएट कोक महाग! इराण-इस्रायल युद्धाचा थेट परिणाम भारतातील ग्राहकांवर

सोन्याला पुन्हा झळाळी; चांदीचीही दमदार उसळी

म्हाडाची आयएचएलएमएस २.० (IHLMS 2.0) ही संपूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक संगणकीय प्रणाली असल्यामुळे सोडत प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना समान आणि निष्पक्ष संधी मिळणार असल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात आला आहे.

मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांनी अर्ज करण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन केले आहे. या पुस्तिकेमध्ये पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, नियम, अटी तसेच सदनिकांचा सविस्तर तपशील देण्यात आला असून ती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

२० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी, अर्ज सादर करणे आणि अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत २८ जुलै २०२६ रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम २९ जुलै रोजी संबंधित बँकेच्या कामकाजाच्या वेळेत भरता येणार आहे. या योजनेसाठी पात्र अर्जदारांची अंतिम यादी ११ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

तर म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ३३२ सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतिम मुदत २० ऑगस्ट २०२६ असून, अनामत रक्कम २१ ऑगस्ट रोजी भरता येईल. या योजनेची अंतिम पात्र अर्जदारांची यादी ४ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. संगणकीकृत सोडतीची तारीख आणि स्थळ नंतर स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार आहे.

म्हाडाने इच्छुक नागरिकांना अधिकृत पोर्टलवरूनच अर्ज करण्याचा सल्ला देत फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नाशिकमध्ये परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर मिळवण्याची ही महत्त्वाची संधी असल्याने इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असेही म्हाडाने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka