Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निडर वैभवचा धडाका; पांड्याही झाला फॅन!

निडर वैभवचा धडाका; पांड्याही झाला फॅन!

NEWS डंका 3 months ago

यपीएल २०२६ मधील राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची मनापासून स्तुती केली.

पांड्या म्हणाला,

'वैभवची फलंदाजी पाहणं खूपच रोचक आहे.

त्याची निडरता आणि फटके खेळण्याची शैली कमाल आहे. तो भविष्याचा मोठा खेळाडू ठरू शकतो.'

'वैभवची फलंदाजी पाहणं खूपच रोचक आहे. त्याची निडरता आणि फटके खेळण्याची शैली कमाल आहे. तो भविष्याचा मोठा खेळाडू ठरू शकतो.'

या सामन्यात वैभवने केवळ १४ चेंडूत ३९ धावा करत मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण चढवलं. त्याच्या या खेळीत ५ षटकार आणि १ चौकार समाविष्ट होता. विशेष म्हणजे, जसप्रीत बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजालाही त्याने एका षटकात २ षटकार ठोकले.

वैभव आणि यशस्वी जायसवाल यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी अवघ्या ५ षटकांत ८० धावांची भागीदारी करत सामन्याची दिशा सुरुवातीलाच बदलली.

वैभवच्या या निडर आणि आक्रमक खेळीमुळे तो केवळ या सामन्याचा नव्हे, तर आगामी काळात भारतीय क्रिकेटचा एक उदयोन्मुख स्टार ठरणार, अशी चर्चा रंगू लागली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka