Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निजामकालीन दागिन्यांचे आमिष दाखवून घातला ५० कोटींचा गंडा

निजामकालीन दागिन्यांचे आमिष दाखवून घातला ५० कोटींचा गंडा

NEWS डंका 1 month ago

हैदराबादमधील एका व्यावसायिकाला लोभामुळे ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या फसवणुकीला बळी पडावे लागेल. हे प्रकरण निजामकालीन दागिन्यांशी संबंधित आहे. व्यावसायिकाचा आरोप आहे की, त्याला दुर्मिळ निजामकालीन दागिन्यांमध्ये वाटा देण्याचे आश्वासन देऊन ५०.८ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली, पण प्रत्यक्षात हे दागिने अस्तित्वातच नव्हते.

मात्र, फसवणूक करणाऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्मिळ निजामकालीन दागिने असल्याचे त्याला सांगितले होते.

दागिन्यांचा व्यवहार २०१६ मध्ये सुरू झाला. ५० वर्षीय व्यावसायिक राजेश अग्रवाल यांनी पोलिसांना सांगितले की, सराफ मोहम्मद झाकीर उस्मान आणि व्यावसायिक सुकेश गुप्ता यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि एका फायदेशीर संधीचे आमिष दाखवले. त्यांनी दावा केला की, ते निजाम काळातील मौल्यवान दागिने असलेले पाच सीलबंद बॉक्स देऊ शकतात, जे कथितरित्या सरकारी ताब्यात होते. जर राजेश यांनी त्यांना पैसे दिले, तर त्यांना दागिन्यांमध्ये वाटा देण्याचे वचन त्यांनी दिले.

त्यांच्यावर विश्वास ठेवून राजेशने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. जून २०१६ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान, त्याने घोटाळेबाजांच्या कंपन्यांना हप्त्यांमध्ये एकूण ५०.८ कोटी रुपये हस्तांतरित केले. राजेशचा आरोप आहे की, त्याला या व्यवहारात सामील केले गेले नाही आणि दागिन्यांमध्ये कोणताही वाटा मिळाला नाही. त्याने दिलेल्या पैशांचा इतर कामांसाठी गैरवापर करण्यात आला. राजेश अग्रवाल यांना देऊ केलेले दागिने खरे होते की केवळ पैसे मिळवण्यासाठी दिलेले खोटे होते, याची आता चौकशी केली जात आहे.

'मूल हवे असल्यास पत्नीला पाठव' नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातून धक्कादायक खुलासे

इराण तणावात अमेरिकेने महागडा MQ-4C ट्रायटन ड्रोन गमावला

भारतीय रेल्वेचे ब्रिटन, रशिया, चीनपेक्षा जास्त विद्युतीकरण

भारत- अमेरिका जेट इंजिन करार; तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यावर भर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी झाकीर उस्मान आणि सुकेश गुप्ता यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६ (विश्वासघात) आणि ३४ (सामूहिक उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित राजेश अग्रवाल यांच्या लेखी तक्रारीनंतर, ९ एप्रिल रोजी हैदराबाद येथील तपास विभागाच्या केंद्रीय गुन्हे ठाण्यात (सीसीएस) हा गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखा (ईओडब्ल्यू) या प्रकरणाचा तपास करत असून, बँकेतील व्यवहार, कंपनीची कागदपत्रे आणि दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या कराराची तपासणी केली जात आहे. हे दागिने निजामकालीन असून ते अस्तित्वात असल्याच्या दाव्यांचीही हैदराबाद पोलीस चौकशी करत आहेत. दोषी आढळलेल्यांवर कारवाई केली जाईल आणि अटक केली जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka