Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नोकराने बॅगेत पैशाऐवजी कागदाचे बोळे भरून केली फसवणूक

नोकराने बॅगेत पैशाऐवजी कागदाचे बोळे भरून केली फसवणूक

मालकाने विश्वासाने दिलेली १ कोटी २० लाख रुपयांची मोठी रक्कम लंपास करून फसवणूक करणाऱ्या नोकराचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पायधुनी पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे राजस्थानपर्यंत धाव घेऊन या गुन्ह्यातील मुख्य आरोपीच्या भावाला अटक केली असून, त्याच्याकडून १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात यश मिळवले आहे.

​तक्रारदार यांनी ८ ऑगस्ट रोजी त्यांचा नोकर पीरसिंह देवडा याच्याकडे दुसऱ्या कार्यालयातून १ कोटी २० लाख रुपये रोख आणण्यासाठी सोपवले होते. मात्र, पीरसिंह देवडा याने तक्रारदाराचा विश्वासघात केला. त्याने पैशांच्या बॅगा बदलून त्यामध्ये कागदाचे बोळे भरले आणि तक्रारदाराना देऊन १ कोटी २० लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबी, सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी पीरसिंह देवडा याने त्याचा भाऊ युवराज सिंग देवडा (वय २४, रा. सिरोही, राजस्थान) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले. पायधुनी पोलिसांच्या पथकाने सातत्यपूर्ण तपास करून १४ ऑगस्ट रोजी राजस्थान गाठले आणि युवराज सिंग याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीच्या रकमेपैकी १ कोटी १६ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

बँक खाते भाड्याने देणं पडलं महागात; २५ कोटींचे व्यवहार उघड

'दिमागी नक्षलवादी' बिळातून बाहेर आले !

कुस्तीच्या आखाड्यात गीतिकांची 'दंगल'!

नंबर-३ साठी टीम इंडियात महासंग्राम!

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पीरसिंह देवडा (वय ३०) सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.​वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पायधुनी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka