Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑगस्टमध्ये १.९९ लाख कोटींचा विक्रमी जीएसटी महसूल जमा

ऑगस्टमध्ये १.९९ लाख कोटींचा विक्रमी जीएसटी महसूल जमा

NEWS डंका 2 weeks ago

र्षभरात १४.८ टक्क्यांची दमदार वाढ

ऑगस्ट महिन्यात देशाच्या जीएसटी महसुलाने दमदार कामगिरी करत १ लाख ९९ हजार ८५३ कोटी रुपयांवर मजल मारली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये १ लाख ७४ हजार ११६ कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता.

त्या तुलनेत यंदा महसुलात तब्बल १४.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, जीएसटी संकलनाने दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यापासून अवघे काही कोटी रुपयांचे अंतर ठेवले आहे. देशातील आर्थिक व्यवहार आणि करसंकलनाची वाढती व्याप्ती यामुळे सरकारच्या महसुलाला मोठा आधार मिळत असल्याचे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

ऑगस्टमधील एकूण जीएसटी संकलनात ३८ हजार ४१३ कोटी रुपये केंद्रीय जीएसटी, ४६ हजार ३१६ कोटी रुपये राज्य जीएसटी आणि १ लाख १५ हजार १२४ कोटी रुपये एकात्मिक जीएसटीचा समावेश आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणाऱ्या जीएसटीमध्येही वाढ झाली असून, हा महसूल ९.३ टक्क्यांनी वाढून १ लाख ३७ हजार २४९ कोटी रुपये झाला आहे. त्याचवेळी आयातीवरील जीएसटी महसुलात तब्बल २९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून, त्यातून ६२ हजार ६०४ कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

मध्यपूर्वेतील युद्धाची धग शेअर बाजाराला; सेन्सेक्स ४७२ अंकांनी घसरला

होर्मुझवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण!

दरम्यान, ऑगस्टमध्ये सरकारकडून ३१ हजार ७९५ कोटी रुपयांचे जीएसटी परतावे देण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत परताव्याच्या रकमेत तब्बल ६७.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. परतावे वजा केल्यानंतर ऑगस्टमधील निव्वळ जीएसटी महसूल १ लाख ६८ हजार ५७ कोटी रुपये राहिला. गेल्या वर्षीच्या १ लाख ५५ हजार १८१ कोटी रुपयांच्या निव्वळ महसुलाच्या तुलनेत यंदा त्यात ८.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत म्हणजेच एप्रिल ते ऑगस्टदरम्यानही जीएसटी संकलनाची कामगिरी मजबूत राहिली आहे. या पाच महिन्यांत देशात एकूण १०.४२ लाख कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाला असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऑगस्टमधील जवळपास दोन लाख कोटींचे संकलन हे सरकारसाठी मोठे सकारात्मक संकेत मानले जात आहेत. आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर या विक्रमी महसुलाकडे विशेष लक्ष लागले असून, जीएसटी व्यवस्थेत आणखी सुधारणा आणि बदलांबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे उद्योगविश्वाचेही लक्ष आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka