Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाक गृहमंत्र्यांकडून हाफिज सईदचे गुणगान; भारताला धमकी

पाक गृहमंत्र्यांकडून हाफिज सईदचे गुणगान; भारताला धमकी

दहशतवाद्यांच्या मंचावरून रशीद अहमद यांनी ओकली गरळ

पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख शेख रशीद अहमद यांनी भारतविरोधी गरळ ओकली असून त्यांचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

एका सार्वजनिक कार्यक्रमात ते दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा (LeT) शी संबंधित व्यक्तींसोबत एकाच मंचावर दिसले. याच कार्यक्रमात त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड म्हणून भारताकडून वॉण्टेड असलेल्या हाफिज सईदचे उघडपणे कौतुक केले आणि भारताविरोधात भडकावू वक्तव्ये केली.

या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात शेख रशीद हे खालिद मसूद संधू आणि कारी मोहम्मद याकूब शेख यांच्यासोबत मंचावर दिसत आहेत. संधू हा लष्कर-ए-तोयबाचा वरिष्ठ कमांडर असून पाकिस्तानमधील पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) चा अध्यक्ष आहे. तर याकूब शेख हा लष्करच्या केंद्रीय सल्लागार समितीचा सदस्य असल्याचे म्हटले जाते. या कार्यक्रमात शेख रशीद यांनी हाफिज सईदबद्दल बोलताना त्याच्याशी असलेली जवळीक उघडपणे व्यक्त केली. 'मी हाफिज साहेबांचा गुलाम आहे,' असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

शेख रशीद यांनी आपल्या भाषणात हाफिज सईदशी संबंधित एक कथित प्रसंगही सांगितला. अमेरिकेत असताना त्यांच्या मोबाईलवर हाफिज सईदचा फोन नंबर दिसला होता आणि त्यानंतर आपल्याला अमेरिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. याच कार्यक्रमात शेख रशीद यांनी भारताविरोधात अत्यंत आक्रमक आणि धमकीवजा वक्तव्य केले. भारताने पाकिस्तानकडे पाहण्याचाही प्रयत्न केला, तर अल्लाह भारताचा नाश करेल, असा दावा त्यांनी केला. यापुढे बोलताना त्यांनी भारतात 'पक्षी किलबिलणार नाहीत आणि मंदिरातील घंटाही वाजणार नाहीत', अशा शब्दांत धमकीवजा वक्तव्य केले. तसेच 'आम्ही पाकिस्तानसोबत आहोत, हाफिज सईदसोबत आहोत,' असेही त्यांनी जाहीरपणे म्हटले.

दिल्लीतील लाल किल्ला स्फोटामागे अल-कायदा?

३६ वर्षांनंतर काश्मिरी पंडित पिता-पुत्र हत्याकांडाची फाईल पुन्हा उघडली

नीट आंदोलनावर चर्चेसाठी अमित शहांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप सिद्ध, घरात सापडली होती प्रचंड रोकड

शेख रशीद अहमद हे पाकिस्तानच्या राजकारणातील चर्चेत असलेले नेते आहेत. इम्रान खान यांच्या सरकारमध्ये २०२० ते २०२२ या काळात त्यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणून काम केले. त्यापूर्वी ते रेल्वेमंत्रीही होते. सध्या ते अवामी मुस्लिम लीगचे संस्थापक आणि प्रमुख आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka