Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाक खेळाडूंशी हात मिळवणार? मजुमदार म्हणाले, 'त्या दिवशी बघू!'

पाक खेळाडूंशी हात मिळवणार? मजुमदार म्हणाले, 'त्या दिवशी बघू!'

NEWS डंका 3 weeks ago

हिला आशिया कप २०२६ मध्ये रविवारी भारतीय महिला संघाची थायलंडविरुद्ध लढत होणार आहे. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार असून, भारताच्या आशिया कप मोहिमेला या सामन्याने सुरुवात होईल.

मात्र, चाहत्यांचे लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागले आहे. दोन्ही संघांमध्ये ५ सप्टेंबर रोजी सामना होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही काळापासून तणावपूर्ण आहेत. एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांमधील अंतरही मैदानावर दिसून आले आहे. पुरुष आणि महिला संघांच्या सामन्यांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी एकमेकांशी हस्तांदोलन न करण्याची भूमिका घेतली होती.

आता आशिया कपमध्येही हेच कायम राहणार का, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय महिला खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार का, असा प्रश्न भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना विचारण्यात आला.

यावर मजुमदार म्हणाले, 'आम्ही मैदानावर सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. मैदानाबाहेरील गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही. त्या दिवशीही सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यावर आमचा भर असेल. जेव्हा तो सामना खेळू, तेव्हा याबाबत बोलू. सध्या आमचे लक्ष थायलंडविरुद्धच्या सामन्यावर आहे.'

थायलंडने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी हाँगकाँगचा ६ धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय संघाला थायलंडविरुद्ध सावध खेळ करावा लागणार आहे.

थायलंडविरुद्धच्या सामन्याबाबत मजुमदार म्हणाले, 'आम्हाला स्पर्धेची चांगली सुरुवात करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आक्रमक क्रिकेट खेळत चांगला निकाल मिळवण्याचा प्रयत्न करू.'

भारतीय महिला संघाची अलीकडील टी-२०मधील कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. याबाबत मजुमदार म्हणाले, 'आम्ही फॉर्मवर फारसे लक्ष देत नाही. गेल्या सहा महिन्यांतील टी-२० कामगिरीबद्दल तुम्ही बोलत आहात. या संघात सुधारणा करण्यासाठी मोठी संधी आहे, हे आम्हाला माहीत आहे. संघात युवा खेळाडू आहेत. आम्ही चांगले आणि आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत आहोत.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka