Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ज्वेलरी शेअर्स ९ टक्क्यांपर्यंत कोसळले

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ज्वेलरी शेअर्स ९ टक्क्यांपर्यंत कोसळले

NEWS डंका 2 weeks ago

पुढील एक वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन

रविवारी सिकंदराबाद येथे आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पुढील एक वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून भारताच्या परकीय चलन साठ्यावरचा ताण कमी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर सोमवारी ज्वेलरी क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. Titan Company, Kalyan Jewellers, Sky Gold आणि Bluestone Jewellery and Lifestyle यांसारख्या कंपन्यांचे शेअर्स १२ टक्क्यांपर्यंत घसरले.

दुपारी १ वाजता टायटनचा शेअर ६.११ टक्क्यांच्या घसरणीसह ४,२३३ रुपयांवर व्यवहार करत होता. तर कल्याण ज्वेलर्सचा शेअर ८.९१ टक्क्यांच्या घसरणीसह ३८७ रुपयांवर होता. स्काय गोल्डचा शेअर ७.८४ टक्क्यांच्या घसरणीसह ४९८.८० रुपयांवर, तर ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाइलचा शेअर ५.६४ टक्क्यांच्या घसरणीसह ४७५ रुपयांवर होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पुढील एक वर्ष अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले, जेणेकरून भारताच्या परकीय चलन साठ्यावरचा ताण कमी होईल. ते म्हणाले, 'सध्याच्या परिस्थितीत परकीय चलनाची बचत देशासाठी अत्यंत महत्त्वाची झाली आहे.' भारताची आयातीत इंधनावरील अवलंबित्वाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचत, अनावश्यक खर्च कमी करणे आणि भारतात तयार होणाऱ्या वस्तूंच्या वापराला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले.

भारताने वर्षभर सोनं खरेदी करणं टाळल्यास किती कोटींची होईल बचत?

भारत-बांगलादेश सीमेवरील कुंपणासाठी बीएसएफला ४५ दिवसांत देणार जमीन

NEET 2026 पेपर लीक? 'अपेक्षित प्रश्नसंच'मधील १४० प्रश्न मूळ परीक्षेशी जुळले

मालदा हिंसाचार प्रकरणी तृणमूलच्या दोन नेत्यांना अटक

तसेच त्यांनी कोविड-१९ काळातील उपाययोजनांप्रमाणे वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन बैठक आणि व्हर्च्युअल कॉन्फरन्स यांचा पुन्हा अवलंब करण्याचे आवाहन केले, जेणेकरून अनावश्यक प्रवास आणि इंधन वापर कमी होईल. पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना परदेश प्रवास आणि डेस्टिनेशन वेडिंग टाळून देशांतर्गत पर्यटन आणि स्थानिक खर्चाला चालना देण्याचेही आवाहन केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka