मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांना पराभव पाहावा लागत आहे. निवडणुकीत जिंकता येत नाही, मग सतत होणाऱ्या पराभवाचे कारण शोधण्याचे काम विरोधकांनी सुरू केले.
हा शोध आधी निवडणूक आयोग आणि तुर्तास निवडणूक आयुक्तांपर्यंत येऊन थांबला. एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनंतर, 'निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात पाठवा, आधीच्या सर्व निवडणुका रद्द करा', अशी बावळट विधाने विरोधकांकडून केली जात आहेत. पुन्हा एकदा पेल्यातील वादळ निर्माण करण्याचे काम सुरू झालेले आहे. एकूण तमाशा पाहून, यापूर्वी निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद नव्हतेच की काय, असा सवाल निर्माण झाला आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेला विरोधी पक्ष हा इतिहासातील सगळ्यात बेजबाबदार आणि खुजा विरोधी पक्ष आहे. सरकारवर शरसंधान करण्यासाठी स्वतः काही शोधावे, अभ्यास करावा, एवढी कुवत यांच्यात नाही. त्यामुळे कायम 'रेडीमेड' काही मिळतेय का, याचा शोध सुरू असतो. ती भूक काही वेळा अर्धवट माहिती असलेल्या बातम्यांच्या माध्यमातून भागवली जाते. 'द न्यू इंडियन एक्सप्रेस' या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे माकडाच्या हाती पुन्हा एकदा कोलीत मिळाले आहे. निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांमध्ये मतभेद, हा बातमीचा गाभा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरुद्ध निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी असे चित्र यात रंगवण्याचा प्रयत्न आहे. या बातमीनंतर विरोधकांना पुन्हा एकदा हर्षवायू झाला आहे. जणू आता सरकार कोसळणार आहे, ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, अशी स्वप्ने विरोधकांना पडू लागली आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील सर्व निवडणुका रद्द करण्याची मागणी होत आहे.
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांना पराभव पाहावा लागत आहे. निवडणुकीत जिंकता येत नाही, मग सतत होणाऱ्या पराभवाचे कारण शोधण्याचे काम विरोधकांनी सुरू केले. हा शोध आधी निवडणूक आयोग आणि तुर्तास निवडणूक आयुक्तांपर्यंत येऊन थांबला. एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनंतर, 'निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना तुरुंगात पाठवा, आधीच्या सर्व निवडणुका रद्द करा', अशी बावळट विधाने विरोधकांकडून केली जात आहेत. पुन्हा एकदा पेल्यातील वादळ निर्माण करण्याचे काम सुरू झालेले आहे. एकूण तमाशा पाहून, यापूर्वी निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद नव्हतेच की काय, असा सवाल निर्माण झाला आहे. देशात सध्या अस्तित्वात असलेला विरोधी पक्ष हा इतिहासातील सगळ्यात बेजबाबदार आणि खुजा विरोधी पक्ष आहे. सरकारवर शरसंधान करण्यासाठी स्वतः काही शोधावे, अभ्यास करावा, एवढी कुवत यांच्यात नाही. त्यामुळे कायम 'रेडीमेड' काही मिळतेय का, याचा शोध सुरू असतो. ती भूक काही वेळा अर्धवट माहिती असलेल्या बातम्यांच्या माध्यमातून भागवली जाते. 'द न्यू इंडियन एक्सप्रेस' या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका बातमीमुळे माकडाच्या हाती पुन्हा एकदा कोलीत मिळाले आहे. निवडणूक आयोगातील तीन आयुक्तांमध्ये मतभेद, हा बातमीचा गाभा आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरुद्ध निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी असे चित्र यात रंगवण्याचा प्रयत्न आहे. या बातमीनंतर विरोधकांना पुन्हा एकदा हर्षवायू झाला आहे. जणू आता सरकार कोसळणार आहे, ज्ञानेश कुमार तुरुंगात जाणार, अशी स्वप्ने विरोधकांना पडू लागली आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील सर्व निवडणुका रद्द करण्याची मागणी होत आहे.

