Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फ्लायदुबई हल्ल्यात इराणचा संबंध असल्यास.

फ्लायदुबई हल्ल्यात इराणचा संबंध असल्यास.

NEWS डंका 3 weeks ago

ट्रम्प यांचा इशारा

दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानातील भारतीय कॅप्टन स्मित माछर यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे इराणचा संबंध असण्याची शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, आपल्याला मिळत असलेल्या माहितीनुसार सह-वैमानिकाचा इराणशी संबंध असण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. इराणचा या हल्ल्यात सहभाग आढळल्यास अमेरिकेकडून जोरदार कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

फ्लायदुबईच्या सह-वैमानिकाचा इराणशी काही संबंध आहे का, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर, 'आम्ही सध्या त्यावर काम करत आहोत. मी जे ऐकत आहे त्यानुसार उत्तर 'हो' असे आहे, पण आम्ही सध्या त्यावर काम करत आहोत,' असे ट्रम्प यांनी सांगितले.

सह-वैमानिकाला इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC ने विमानात पाठवले असावे किंवा त्याचे इतर कोणत्या मार्गाने कट्टरतावादीकरण झाले असावे का, असा प्रश्नही ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, 'असू शकते, हो,' असे उत्तर दिले. मात्र, इराणच्या सहभागाचा अद्याप कोणताही अधिकृत पुरावा समोर आलेला नाही. त्यामुळे ट्रम्प यांनी व्यक्त केलेली शक्यता आणि तपासातून सिद्ध झालेले तथ्य यामध्ये फरक आहे.

या प्रकरणात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे. गुरुवारी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्यांना सह-वैमानिकाच्या इराणशी असलेल्या कथित संबंधांबाबत विचारण्यात आले. त्यावर, त्याचा इराणशी किंवा अन्य कोणाशी संबंध होता की नाही, हे आत्ताच सांगणे घाईचे ठरेल, असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आणखी काही दिवसांत अधिक माहिती मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, सह-वैमानिकावर इस्लामी कट्टरतावादाचा प्रभाव असल्याचे संकेत मिळत असल्याचा दावा नेतान्याहू यांनी केला. त्याच्या वैयक्तिक पार्श्वभूमीच्या तपासातून ही माहिती समोर आल्याचे त्यांनी म्हटले.

तीस्ता नदीवरील १,१७५ कोटींच्या पुल प्रकल्पाला मंजुरी

भारत-फ्रान्स सागरी सराव 'वरुण'ला सुरुवात

दुबईत स्मित यांच्या कुटुंबीयांची भारतीय राजदूतांनी घेतली भेट

अमेडियात ९९ टक्के हिस्सा असताना पार्थ पवार आरोपी का नाहीत?

सह-वैमानिक ओमानचा नागरिक

इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा सह-वैमानिक ओमानचा नागरिक होता. त्याची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. या हल्ल्यामागील नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. सह-वैमानिकाने कॅप्टनवर हल्ला का केला, विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न का केला आणि या घटनेचा कोणत्याही दहशतवादी कारवाईशी संबंध होता का, याचा तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka