Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये हातभट्टीच्या विषारी दारुने १३ दगावले

पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये हातभट्टीच्या विषारी दारुने १३ दगावले

NEWS डंका 3 weeks ago

मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश

राज्यातील पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारु पिऊन आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली असून अनेकजण गंभीर आहेत.

पिंपरी- चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्यातील काळेपडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून मृतांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दारू पिऊन घरी आल्यावर काही वेळाने काहींच्या तोंडातून फेस आला, तर कुणाला चक्कर आल्याने बाथरूममध्ये पडले तर कुणाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

विषारी स्पिरिटयुक्त दारु योगेश वानखेडे याने बनवली होती, अशी माहिती समोर आली आहे. ती दारु पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमधे मिळून विकली गेली. दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ भागातील ज्यांनी दारु प्यायली ते तोंडाला फेस येऊन मृत्युमुखी पडले. योगेश वानखेडे हा सराईत दारु विक्रेता असून या आधी अनेक गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. त्याला पोलीसांनी अटक केली आहे.

तेलवाहू जहाजाने ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी; ३ जूनला विशाखापट्टणममध्ये पोहचणार

नाशिकनंतर आता कॉर्पोरेट जिहाद नरिमन पॉईंटला! स्टेट बँकेत हिंदू महिला टार्गेट

घरात एसीचा स्फोट होऊन स्पर्धा आयोगाचे पहिले प्रमुख, धनेंद्र कुमार दगावले

एअर इंडिया, इंडिगोकडून देशांतर्गत विमानसेवेत कपात

दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी आठ नागरिकांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, याच परिसरातील रहिवासी असलेल्या आणखी दोघांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू असून, दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बंदी असलेली हातभट्टीची गावठी (विषारी) दारू प्यायल्यानेच या नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. परिसरात अवैध हातभट्टीची दारू सर्रास विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka