Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राघव चढ्ढा यांच्या जागी निवडलेल्या मित्तल यांच्यावर ईडीचे छापे

राघव चढ्ढा यांच्या जागी निवडलेल्या मित्तल यांच्यावर ईडीचे छापे

NEWS डंका 1 month ago

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार अशोक मित्तल आणि त्यांच्या मुलाच्या संबंधित ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे. गुरुग्राम, पंजाब आणि जालंधर यांसह ८ ते ९ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले.

ही कारवाई निधीशी संबंधित कथित गैरव्यवहारांच्या आरोपांवरून करण्यात येत आहे.

माहितीनुसार, ईडीच्या पथकांनी अशोक मित्तल यांच्या घर, फार्महाऊस आणि इतर ठिकाणांची तपासणी सुरू केली आहे. तसेच, त्यांच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू)मध्येही एजन्सीची टीम पोहोचली असून, तेथे कागदपत्रांची छाननी केली जात आहे. विद्यापीठाच्या निधीशी संबंधित काही प्रकरणांत अनियमिततेचे संकेत मिळाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अशोक मित्तल हे पंजाबमधून 'आप'चे राज्यसभा सदस्य असून, लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि कुलाधिपतीही आहेत. अलीकडेच पक्षात त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आल्यानंतर ही कारवाई झाली आहे. आम आदमी पक्षाने २ एप्रिल रोजी अशोक मित्तल यांची राज्यसभेत पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती. त्यांनी राघव चड्ढा यांची जागा घेत ही जबाबदारी स्वीकारली आहे. हा बदल पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र पाठवून अधिकृत केला होता.

यापूर्वी, आयएएनएसशी बोलताना अशोक मित्तल यांनी या नव्या जबाबदारीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले होते. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे आभार मानत ही भूमिका प्रामाणिकपणे आणि समर्पणाने पार पाडण्याचे आश्वासन दिले होते. अशोक मित्तल यांनी संसदेत आणि संसदेबाहेर पक्षाचा आवाज ठामपणे मांडण्याचा आपला उद्देश असल्याचे सांगितले होते. तसेच, देश आणि विशेषतः पंजाबच्या हितांना प्राधान्य देण्याचेही त्यांनी म्हटले होते. पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला आपण पात्र ठरू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

बंगाल कोळसा घोटाळा प्रकरण: आय-पॅकच्या सह-संस्थापकांच्या कुटुंबियांना समन्स

भारतीय जहाजांना 'होर्मुझ' टोल नाही

क्षेपणास्त्र हल्ल्याची भीती; इराणी शिष्टमंडळाचा नाट्यमय प्रवास

अमेरिका-इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर!

दरम्यान, ईडीच्या कारवाईवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिले, 'भाजप पंजाब निवडणुकांची तयारी करत आहे. 'आप'चे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घर आणि युनिव्हर्सिटीवर ईडीची रेड. टिपिकल मोदी स्टाइल.' पुढे ते म्हणाले, 'आम्ही असे पान नाही की झाडावरून तुटून पडू. वादळांना त्यांची मर्यादा ओळखायला सांगा.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka