Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज ठाकरे, आपण यांना ओळखलंत का?

राज ठाकरे, आपण यांना ओळखलंत का?

NEWS डंका 2 weeks ago

मोदींकडून महादू गवित यांच्या कर्तृत्वाचा गौरव

देशासाठी सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या नाशिकच्या दिलीप महादू गवित यांच्या कर्तृत्वाचा देशभर गौरव होत असताना त्यांच्या भेटीशी संबंधित एक वेगळाच प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकावणाऱ्या गवित यांना नाशिक दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी तब्बल अडीच तास ताटकळत बसावे लागले. मात्र एवढा वेळ प्रतीक्षा करूनही भेट न झाल्याने अखेर गवित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना निघून जावे लागले.

गवित हे काही साधेसुधे पाहुणे नव्हते. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवत त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. त्यांच्या या कामगिरीमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव झाला. अशा खेळाडूला भेटण्यासाठी काही मिनिटे काढणे ही कौतुकाची बाब ठरली असती; मात्र येथे उलट अडीच तासांची प्रतीक्षा पदरी पडली.

या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर राज ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. 'मला कुणीही सांगितलं नाही', असे म्हणत त्यांनी गवित यांना आपण मुद्दाम भेटलो नाही, असा कोणताही हेतू नसल्याचे स्पष्ट केले. गवित आले होते, याची माहितीच आपल्याला देण्यात आली नव्हती. माहिती असती तर आपण त्यांची नक्कीच भेट घेतली असती, असे ठाकरे यांनी सांगितले.

मात्र याचदरम्यान समोर आलेले एक छायाचित्र या संपूर्ण प्रकरणाला आणखी वेगळा संदर्भ देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या निवासस्थानी कॉमनवेल्थ गेम्समधील पदकविजेत्या भारतीय खेळाडूंसाठी हाय टीचे आयोजन केले. यावेळी मोदी यांनी सुवर्णपदक विजेते दिलीप गवित यांची आवर्जून भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले.

एका बाजूला देशासाठी सुवर्णपदक जिंकलेल्या गवितांचा पंतप्रधान मोदींकडून सन्मान; तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंच्या भेटीसाठी अडीच तास प्रतीक्षा करूनही भेट न झाल्याची घटना. त्यामुळे या दोन्ही प्रसंगांची तुलना सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज ठाकरे, आपण यांना ओळखलंत का? देशासाठी सुवर्णपदक जिंकणारा हा खेळाडू केवळ एक व्यक्ती नाही, तर महाराष्ट्राचा अभिमान आहे!

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka