Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राम मंदिराच्या सीईओपदी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा

राम मंदिराच्या सीईओपदी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा

NEWS डंका 2 weeks ago

५,५८५ अर्जांतून झाली निवड

योध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) भारतीय हवाई दलाचे निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राम मंदिराच्या व्यवस्थापनासाठी प्रथमच पूर्णवेळ सीईओ नियुक्त करण्यात आला असून, ट्रस्टच्या बैठकीत मिश्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलात प्रदीर्घ सेवा बजावली आहे. ते वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफमध्ये डेप्युटी चीफ (ऑपरेशन्स) तसेच डॉक्ट्रिन, ऑर्गनायझेशन आणि ट्रेनिंग विभागाचे डेप्युटी चीफ म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. ऑपरेशन सिंदूरदरम्यान त्यांनी वेस्टर्न कमांडची धुरा सांभाळली होती.

जितेंद्र मिश्रा यांना ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या फायटर स्ट्रीममध्ये कमिशन मिळाले होते. ३८ वर्षांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी ३,००० तासांपेक्षा अधिक उड्डाणाचा अनुभव घेतला असून, १८ हून अधिक प्रकारची फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट विमाने आणि हेलिकॉप्टर उडवली आहेत.

५.५ टन औषधांसह बचाव पथक घेऊन पाचवे विमान नेपाळकडे रवाना

होर्मुझवर अमेरिकेचे जवळपास पूर्ण नियंत्रण!

अरे बापरे !! अमित ठाकरे थेट मोदींना भिडले

पाकिस्तानची कोती मनोवृत्ती, मोदींचा फोटोच हटवला!

राम मंदिराच्या पहिल्या सीईओ पदासाठी तब्बल ५,५८५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी तीन उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आणि त्यातून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली. सीईओ निवडीसाठी AI-आधारित स्क्रीनिंगसोबतच प्रत्यक्ष मूल्यांकनाची प्रक्रियाही राबवण्यात आली. अर्जदारांच्या मूल्यांकनासाठी ६०० गुणांची प्रणाली तयार करण्यात आली होती. प्राथमिक टप्प्यात ३,५७७ उमेदवारांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर १०८ उमेदवारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधण्यात आला, तर अंतिम टप्प्यात १६ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka