Dailyhunt
रसेल गेला. ग्रीन आला, पण 'पावर' कुठे?

रसेल गेला. ग्रीन आला, पण 'पावर' कुठे?

NEWS डंका 1 month ago

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ यांचे मत आहे की, कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघात आंद्रे रसेलची उणीव कॅमेरून ग्रीन भरून काढू शकणार नाही. एशेज आणि टी२० विश्वचषकात ग्रीनची कामगिरी विशेष ठळक नव्हती, त्यामुळे आयपीएल २०२६ मध्ये त्याच्यावर सर्वांची नजर असेल, असे त्यांनी सांगितले.

कैफ यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले, 'ग्रीन खूप टॅलेंटेड असू शकतो, पण रसेलची जागा घेऊन केकेआरवर तसाच प्रभाव टाकण्यासाठी त्याला खूप वेळ लागेल. तो रसेलच्या जवळपासही नाही. तो चांगला फलंदाज आहे, पण रसेलशी तुलना केली तर मोठा फरक दिसतो.'

ते पुढे म्हणाले, 'रसेलने आपल्या फलंदाजीने मोठं योगदान दिलं आणि तो 'गोल्डन आर्म' गोलंदाजही होता. त्याला नेहमी चार षटके टाकण्याची संधी मिळाली नाही, पण जेव्हा मिळाली तेव्हा त्याने विकेट्स घेतल्या. त्याची उणीव ग्रीनही भरू शकत नाही.'

कैफ यांनी केकेआरमधील वेस्ट इंडिजचा आणखी एक अष्टपैलू खेळाडू रोवमन पॉवेललाही रसेलच्या तोडीचा मानण्यास नकार दिला.

ते म्हणाले, 'केकेआरला क्रिस गेलसोबत जे घडलं ते पुन्हा घडू द्यायचं नव्हतं. आंद्रे रसेल अजूनही विविध लीगमध्ये खेळतो आणि पूर्णपणे निवृत्त झालेला नाही. त्यामुळे नंतर योजना बदलण्यात आली. केकेआरला वाटलं की तो लिलावात गेला आणि गेलप्रमाणे धमाकेदार कामगिरी केली, तर ती मोठी चूक ठरेल. त्यामुळे त्याच्याशी चर्चा करून सपोर्ट स्टाफमध्ये सामील करण्याचा निर्णय घेतला. यात शाहरुख खानची भूमिका महत्त्वाची आहे.'

आंद्रे रसेलने आयपीएल २०२६पूर्वी लीगमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर केकेआरने त्याची 'पॉवर कोच' म्हणून नियुक्ती केली.

आयपीएल २०२६ मध्ये केकेआर आपला पहिला सामना २९ मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka