Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रशिया ठरला भारतासाठी ऊर्जा 'लाइफलाइन';तेल आयातीत ८२% वाढ

रशिया ठरला भारतासाठी ऊर्जा 'लाइफलाइन';तेल आयातीत ८२% वाढ

NEWS डंका 3 months ago

पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत

श्चिम आशियातील तणावामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रशिया भारतासाठी 'लाइफलाइन' ठरत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

त्यामुळे भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ दरम्यान भारताच्या रशियन तेल आयातीत तब्बल ८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे तेल पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले असून विशेषतः हॉर्मूज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) मार्गावरील तणावामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. भारताच्या सुमारे ४० टक्के कच्च्या तेलाची आयात या मार्गावर अवलंबून असल्याने त्याचा थेट परिणाम देशावर झाला आहे.

'कोणताही लॉकडाउन नाही, 'टीम इंडिया'सारखे काम करायचे आहे…'

सायना नेहवाल: भारताचा ऑलिम्पिक अभिमान

रशियाची मोठी आर्थिक कोंडी! २५ वर्षांनंतर सोन्याच्या विटांची विक्री सुरू

इराण संबंधित संघर्षामुळे तेल उत्पादन आणि वाहतुकीवर परिणाम झाला असून जागतिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. परिणामी भारताला पर्यायी स्रोतांचा शोध घ्यावा लागला आणि त्यासाठी रशिया हा सर्वात महत्त्वाचा पर्याय ठरला आहे.

रशियाकडून मिळणारे कच्चे तेल तुलनेने स्वस्त असल्यामुळे भारतासाठी हा पर्याय अधिक फायदेशीर ठरत आहे. तसेच, रशियाने भारताला अतिरिक्त तेल पुरवठा करण्याची तयारीही दर्शवली आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जा गरजा भागवण्यात रशियाची भूमिका अधिक मजबूत होत आहे.

याशिवाय, भारताने केवळ कच्च्या तेलापुरते मर्यादित न राहता द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) खरेदीसाठीही रशियाशी चर्चा सुरू केली आहे. कारण पश्चिम आशियातून एलएनजीचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. या सर्व घडामोडींमुळे भारताचे ऊर्जा धोरण अधिक विविधीकरणाकडे वळत असल्याचे स्पष्ट होत आहे. पूर्वी भारताचा मोठा भर मध्यपूर्वेतील देशांवर होता, मात्र सध्याच्या संकटामुळे भारताने रशिया तसेच इतर देशांकडूनही ऊर्जा पुरवठा वाढवण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

एकूणच, जागतिक राजकीय तणाव आणि पुरवठा साखळीतील अडचणी यामुळे भारताने आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी रशियावर अधिक भर दिला आहे. रशियन तेलाची वाढती आयात ही केवळ तात्पुरती उपाययोजना नसून भविष्यातील ऊर्जा धोरणातही ती महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka