Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'रत्नागिरी मराठा ज्ञाती'च्या बालविकास विद्यामंदिरचे १००% यश

'रत्नागिरी मराठा ज्ञाती'च्या बालविकास विद्यामंदिरचे १००% यश

NEWS डंका 2 weeks ago

आरजेएमडीएसची ९९.३८ टक्क्यांसह गगनभरारी!

त्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई संचालित बालविकास विद्यामंदिर आणि आरजेएमडीएस (RJMDS) इंग्लिश स्कूल या दोन्ही शाळांनी दहावीच्या २०२६च्या परीक्षेत मध्ये घवघवीत यश संपादन करत शिक्षणाच्या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.

जोगेश्वरीतील अग्रगण्य शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बालविकास विद्यामंदिरचा निकाल यंदा १००% लागला आहे. तर, आरजेएमडीएस इंग्लिश स्कूलने ९९.३८% गुणांसह यशाची परंपरा कायम राखली आहे. या निकालामुळे संपूर्ण जोगेश्वरी परिसरात आनंदाचे वातावरण असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

शतायुषी निसर्गप्रेमी डेव्हिड ऍटनबरोंना एका निसर्गप्रेमीच्या अशाही शुभेच्छा!

स्पेनकडे जाणाऱ्या क्रूझ जहाजावर हंटाव्हायरसचा उद्रेक; ३ जणांचा मृत्यू

बापमाणूस सूर्या आता मैदान गाजवणार

गोवा शिपयार्डमध्ये 'अचल'ची भारतीय तटरक्षक दलात दमदार एन्ट्री

शाळेचे गुणवंत विद्यार्थी

बालविकास विद्यामंदिर:

१. प्रथम: कुमार पियुष प्रमोद शिगवण (९२.६०%)

२. द्वितीय: तनुजा राजेंद्र बोथरे (९२%)

३. तृतीय: अनुष्का देवचंद चोरगे (८९.२०%)

आरजेएमडीएस (RJMDS) इंग्लिश स्कूल:

१. प्रथम: दूर्वा महादेव घाडीगावकर (९५.४०%)

२. द्वितीय: लौकिक रामचंद्र परब (९२%)

३. तृतीय: खुशी संदीप चव्हाण (९१.६०%)

संस्थेकडून कौतुक

विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान यशानंतर रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत यांनी दोन्ही शाळांना भेट देऊन मुख्याध्यापक जगदीश सूर्यवंशी सर, डिंपल दुसाने मॅडम, पर्यवेक्षक निळे सर आणि सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

'शिक्षकांचे कष्ट आणि मुलांची मेहनत यामुळेच आज जोगेश्वरीच्या मातीत हे यशाचे पीक उगवले आहे,' अशा शब्दांत सावंत यांनी कौतुक केले.

या यशस्वी प्रसंगी संस्थेचे उपकार्याध्यक्ष अशोक परब, सरचिटणीस जितेंद्र पवार, चिटणीस सुरक्षा घोसाळकर, आरजेएमडीएसचे सीईओ दीपक खानविलकर, कार्यकारिणी सदस्य सुशील चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनीही शाळेच्या या ऐतिहासिक यशाबद्दल शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka