Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रात्री १२ नंतर फेसबुक-इन्स्टाग्राम बंद होणार?

रात्री १२ नंतर फेसबुक-इन्स्टाग्राम बंद होणार?

NEWS डंका 2 weeks ago

मुलांच्या सोशल मीडिया वापरावर मेटाचा मोठा निर्णय

मुलांचा सोशल मीडिया वापर वाढत असताना त्यांना या प्लॅटफॉर्मच्या अतिवापरापासून दूर ठेवण्यासाठी मेटाने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेत मेटाविरोधात दाखल झालेल्या खटल्यांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या समझोत्यामुळे १८ वर्षांखालील मुलांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरावर कडक निर्बंध लागू होणार आहेत.

या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रात्री १२ वाजल्यानंतर ते सकाळी ६ वाजेपर्यंत अल्पवयीनांना फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरता येणार नाही. म्हणजेच मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत या दोन्ही प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी प्रवेश बंद राहणार आहे. मुलांनी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर राहण्याऐवजी पुरेशी झोप घ्यावी, हा या निर्णयामागचा प्रमुख उद्देश आहे.

यासोबतच अल्पवयीनांच्या सोशल मीडिया स्क्रीन टाइमवरही मर्यादा आणली जाणार आहे. १८ वर्षांखालील वापरकर्त्यांना फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एकत्रितपणे दररोज दोन तासांपर्यंत वापराची परवानगी असेल. मात्र पालकांची संमती असल्यास ही मर्यादा वाढवता येणार आहे. त्यामुळे मुलांच्या सोशल मीडिया वापरावर पालकांना अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे. रात्रीच्या वेळेत अनावश्यक नोटिफिकेशनमुळे मुलांचे लक्ष मोबाईलकडे जाऊ नये, यासाठी नोटिफिकेशनवरही निर्बंध आणले जाणार आहेत.

राहुल गांधींची 'झूठ की गुंज'; दिशाभूल करणाऱ्या दाव्याना प्रत्युत्तर

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांना दिलासा!

देशात घरांच्या किमती वाढल्या, पण खरेदीचा वेग मंदावला!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत नवीन व्हिडीओ, फोटो आणि पोस्ट दाखवून वापरकर्त्यांचा स्क्रीन टाइम वाढवला जात असल्याची चिंता गेल्या काही वर्षांपासून व्यक्त केली जात आहे. विशेषतः किशोरवयीन मुलांवर या वापराचा मानसिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतो, असा दावा मेटाविरोधातील खटल्यांमध्ये करण्यात आला होता. मुलांना प्लॅटफॉर्मवर अधिकाधिक वेळ घालवण्यासाठी आकर्षित करणारी वैशिष्ट्ये तयार केल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात आला. मात्र या समझोत्यामध्ये मेटाने कोणतीही चूक मान्य केलेली नाही.

अल्पवयीन वापरकर्त्यांसाठी लाईक्स आणि रिअॅक्शनची संख्या लपवणे, काही कॉस्मेटिक प्रक्रियांशी संबंधित इमेज फिल्टरवर निर्बंध आणणे आणि पालकांसाठी अधिक प्रभावी पॅरेंटल कंट्रोल्स उपलब्ध करून देणे, अशा उपायांचाही या बदलांमध्ये समावेश आहे. यामुळे मुलांच्या सोशल मीडिया वापरावर अधिक सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मेटाचा हा निर्णय केवळ एका कंपनीच्या नियमांपुरता मर्यादित नसून सोशल मीडिया कंपन्यांसाठी महत्त्वाचा इशारा मानला जात आहे. मुलांचा स्क्रीन टाइम वाढवण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षिततेला, मानसिक आरोग्याला आणि झोपेला प्राधान्य देण्याची गरज या निर्णयातून अधोरेखित झाली आहे. आता रात्री १२ नंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मुलांसाठी लागणारे 'डिजिटल लॉक' प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते, याकडे पालकांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka