Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या मौलानाचे मुंडण, तोंड काळे

सहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या मौलानाचे मुंडण, तोंड काळे

NEWS डंका 3 weeks ago

लोकांनी यथेच्छ ठोकून काढले

आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विरोधी पक्ष वायएसआर काँग्रेस पार्टी (YSRCP)शी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या ६० वर्षीय मौलाना ख्वाजा हुसेन याच्यावर सहा वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करण्याचा गंभीर आरोप आहे.

अहवालांनुसार, स्थानिक लोकांनी त्याला रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याला रस्त्यावरच मारहाण केली.

माहितीनुसार, ही घटना अनंतपूर जिल्ह्यातील रुद्रमपेटा परिसरात घडली. आरोप आहे की, मौलाना ख्वाजा हुसेन याने ६ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही बाब समजताच स्थानिक नागरिक आणि मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमावाने आरोपीला जोरदार मारहाण केली. संताप इतका वाढला की लोकांनी आरोपीचे मुंडण केले, तसेच त्याला विवस्त्र करून चेहऱ्यावर काळे फासून गल्लीबोळांतून फिरवले. त्यानंतर पीडित कुटुंबीय आणि स्थानिकांनी आरोपीला ओढत 'फोर्थ टाउन' पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

आरोपी ख्वाजा हुसेन याचा YSRCPशी संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि आंदोलकांनी पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप करत, राजकीय दबावाखाली आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला. पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

दाऊदचा निकटवर्ती डोला भारतात आला!

अमेरिकेच्या नाकेबंदीनंतरही जहाजं पार करतायत होर्मुझ! कसे ते जाणून घ्या

तुर्कीयेत भारताची धुरंधर कारवाई; बडे साहाबला धक्का

क्लिप वारंवार पाहिली, दिशा बदलली नाही

पोलिसांनी आरोपी ख्वाजा हुसेन याला ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया पुढे सुरू आहे. कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात पीडितेचा जबाब नोंदवणे आणि वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, कायदा आपले काम करेल आणि आरोपीला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka