भारत-चीन संबंधांमध्ये नवी सुधारणा
ब्रिक्स शिखर परिषदेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यापूर्वी चायना सदर्न एअरलाइन्सने सहा वर्षांनंतर ग्वांगझोऊ-नवी दिल्लीदरम्यान विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
२१ सप्टेंबरपासून ग्वांगझोऊ-नवी दिल्ली मार्गावर नियमित प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. भारत आणि चीनमधील हवाई संपर्क पूर्ववत करण्याच्या प्रक्रियेला यामुळे आणखी मोठी चालना मिळाली आहे.
चायना सदर्न एअरलाइन्सने शनिवारी घोषणा केली की, २१ सप्टेंबरपासून ग्वांगझोऊ-नवी दिल्ली मार्गावर नियमित प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू केली जाईल. विमान कंपनीच्या माहितीनुसार, भारतासाठी तिच्या विमानसेवेचे सहा वर्षांनंतर पुनरागमन होत आहे. सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर कंपनी दक्षिण आशियातील आपल्या आठ राउंड-ट्रिप मार्गांवर दर आठवड्याला १०० हून अधिक उड्डाणे चालवणार आहे. या निर्णयाकडे भारत आणि चीनमधील संपर्क वाढवण्याच्या तसेच प्रवासाच्या सुविधा विस्तारण्याच्या दृष्टीने पाहिले जात आहे. दोन्ही देशांमधील हवाई संपर्क वाढल्याने आर्थिक, व्यापारी आणि पर्यटन संबंधांनाही नवी गती मिळू शकते.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी नवी दिल्लीत दाखल झाले असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे. शिखर परिषदेदरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही प्रस्तावित आहे.
मोदींचा ब्रिक्समधील 'तो' फोटो सांगतोय भारताची कूटनीती!
माजी लष्करी हवालदाराने चोरल्या चार AK-203 रायफल्ससह १,९०० काडतुसे
चॅट जीपीटीच्या मदतीने बनवले होते पंतप्रधान कार्यालयाचे बनावट ओळखपत्र
सुरक्षित समुद्री वाहतूक, कर्मचाऱ्यांची सुरक्षा सर्वोपरी
एएनआयच्या माहितीनुसार, एप्रिलमध्ये एअर चायनाने बीजिंग-नवी दिल्लीदरम्यानची थेट विमानसेवा पुन्हा सुरू केली होती. त्यापूर्वी चायना ईस्टर्न एअरलाइन्सने कुनमिंग आणि कोलकाता दरम्यानची थेट विमानसेवाही पुन्हा सुरू केली होती. तसेच ३० मार्च रोजी इंडिगोने कोलकाता-शांघायदरम्यान आपली पहिली दैनंदिन नॉन-स्टॉप विमानसेवा सुरू केली होती. याशिवाय कोलकाता-ग्वांगझोऊ आणि दिल्लीहून चीनसाठीच्या विमानसेवांचाही विस्तार करण्यात आला आहे.

