Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सज्जन कुमार यांच्या घरी गेलेल्या भाजपच्या ३ खासदारांना फटकारले

सज्जन कुमार यांच्या घरी गेलेल्या भाजपच्या ३ खासदारांना फटकारले

NEWS डंका 2 months ago

नितीन नबीन यांनी खासदारांना सुनावले

सज्जन कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त करणाऱ्या भाजपच्या दिल्लीतील तीन खासदारांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी फटकारले आहे.

कमलजीत सहरावत, रामवीर सिंह बिधुरी आणि योगेंद्र चंदोलिया यांनी सज्जन कुमार यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र, १९८४ च्या शीखविरोधी दंगलींच्या पार्श्वभूमीवर या भेटीवर पक्षांतर्गत नाराजी व्यक्त करण्यात आली.

सज्जन कुमार हे १९८४ च्या शीखविरोधी दंगलीतील हत्येच्या प्रकरणात दोषी ठरले होते आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या तीन खासदारांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले. दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या मुद्द्यावर भाजपने सातत्याने भूमिका घेतलेली असताना पक्षाच्या खासदारांनी दोषी ठरलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांची भेट घेणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित झाला.

पाकिस्तानची फलंदाजी की गल्ली क्रिकेट!

पंतप्रधान मोदी उझबेकिस्तान - किर्गिस्तानच्या दौऱ्यावर

दलितांच्या अपमानावर राहुल गांधी आक्रमक

या प्रकरणावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी नाराजी व्यक्त करत संबंधित खासदारांना स्पष्ट शब्दांत समज दिली. दरम्यान, भाजपने या भेटीपासून अधिकृतपणे अंतर राखले आहे. पक्षाचे प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी स्पष्ट केले की, तिन्ही खासदार पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर वैयक्तिक क्षमतेत सज्जन कुमार यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे या भेटीचा पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी संबंध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले.

या घटनेमुळे १९८४ च्या दंगलींचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विशेषतः दंगलीतील पीडितांच्या न्यायासाठी भाजपने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर तीन खासदारांची ही भेट पक्षासाठी अडचणीची ठरली आहे. एका बाजूला मानवी संवेदना आणि दुसऱ्या बाजूला १९८४ च्या दंगलींचा संवेदनशील इतिहास यामुळे या भेटीवरून भाजपमध्येच सावध भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka