Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सलग पाचव्या विजयासह गुजरात टायटन्स अव्वल, हैदराबाद तिसऱ्या स्थानावर

सलग पाचव्या विजयासह गुजरात टायटन्स अव्वल, हैदराबाद तिसऱ्या स्थानावर

यपीएल २०२६ मधील ५६व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८२ धावांनी पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातचा हा सलग पाचवा विजय ठरला.

टॉस जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात १६९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादचा डाव १४.५ षटकांत ८६ धावांवर आटोपला.

गुजरातकडून कगिसो रबाडाने प्रभावी गोलंदाजी करत ४ षटकांत २८ धावा देऊन ३ विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या विजयानंतर गुजरात टायटन्सचे १२ सामन्यांत १६ गुण झाले असून संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ११ सामन्यांत १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. समान गुण असूनही कमी नेट रनरेटमुळे सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. पंजाब किंग्स १३ गुणांसह चौथ्या, तर चेन्नई सुपर किंग्स १२ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

राजस्थान रॉयल्स १२ गुणांसह सहाव्या, दिल्ली कॅपिटल्स १० गुणांसह सातव्या आणि कोलकाता नाईट रायडर्स ९ गुणांसह आठव्या स्थानावर आहेत.

मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचे प्रत्येकी ६ गुण असून ते अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

फलंदाजांमध्ये सनरायझर्स हैदराबादचा हेनरिक क्लासेन १२ सामन्यांत ५०८ धावांसह ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमारने ११ सामन्यांत २१ विकेट घेत पर्पल कॅप कायम राखली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka