Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सलमान खानच्या घराबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू

सलमान खानच्या घराबाहेर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू

NEWS डंका 2 weeks ago

अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात केले होते दाखल

भिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या मुंबई पोलिसांच्या एका हवालदाराचा शुक्रवारी (७ ऑगस्ट) अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला.

दिनेश रायते असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, प्राथमिक माहितीनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

रायते हे वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट परिसरात सलमान खानच्या सुरक्षेसाठी तैनात होते. शुक्रवारी बंदोबस्तावर असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती खालावल्याने त्यांना तत्काळ वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दिनेश रायते यांनी २००४ मध्ये मुंबई पोलिस दलात सेवा सुरू केली होती. ते मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र (LA) युनिट-४शी संलग्न होते. बंदोबस्तावर असताना अचानक झालेल्या या घटनेने पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, सलमान खानला कथित बिश्नोई टोळीकडून वारंवार धमक्या मिळाल्यानंतर त्याच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. एप्रिल २०२४ मध्ये सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात आला होता. तपासादरम्यान बिश्नोई टोळीशी कथित संबंध असलेल्या काही संशयितांना अटक करण्यात आली होती.

बंगळुरूतील पंचतारांकित हॉटेल्समधून कालबाह्य दूध, खराब मांस जप्त

चीनच्या 'मॅप वॉर'ला भारताचे प्रत्युत्तर; अरुणाचलमधील २७ ठिकाणांना अधिकृत ओळख

नाक खुपसू नका! 'एफसीआरए' भारताचा अंतर्गत विषय!!

भारताकडे येणाऱ्या ६२ जहाजांनी सुरक्षितपणे ओलांडली होर्मुझ

या पार्श्वभूमीवर गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात असतो. त्याच बंदोबस्तावर असताना रायते यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. रायते यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण निश्चित होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka