Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संसद, सरकार, सर्वोच्च न्यायालय म्हणजे बर्गर, पिझ्झा..

संसद, सरकार, सर्वोच्च न्यायालय म्हणजे बर्गर, पिझ्झा..

जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांची सुनावणी करताना, 'आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका, त्यांना अटक केली असेल तर सोडून द्या,' असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, 'कॉकरोच जनता पार्टी'ला (CJP) हे मान्य नाही. त्यांना ही धोक्याची घंटा वाटते आहे. हे संरक्षण फक्त विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नको, तर सराईत गुन्हेगारांनाही हवे, असा हट्ट त्यांनी धरला आहे. आंदोलनात सामील होण्यापूर्वी ज्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे, त्यांचीही सुटका व्हावी अशी सीजेपीची मागणी आहे. खुन, दरोडा, ड्रग्ज, बलात्कारी आदी गुन्ह्यात गुंतलेले २,८७३ सराईत गुन्हेगार आंदोलनात सामील झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी उघड केली आहे. त्यांनाही सरकारने हात लावू नये असा झुरळांचा हट्ट आहे. हट्ट पुरवला नाही तर पुन्हा आंदोलन सुरू करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे, 'जय भीम'च्या घोषणा द्यायच्या आणि घटनेवरच बुलडोझर चालवण्याचे काम करायचे, असा हा प्रकार आहे. सीजेपीचा सौरभ दास याने काल त्याच्या 'एक्स' (X) हँडलवरून एक सविस्तर पोस्ट टाकली आहे, त्यात हेच म्हटले आहे. न्यायालयाची शिकवणी घेण्याचा इरादा यात स्पष्ट दिसतो. 'सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय वापर होऊ नये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा शस्त्रासारखा वापर केला जाऊ नये,' अशी आणखी एक पोस्ट त्याने टाकली आहे. हे त्याने कॅमेऱ्यासमोरही सांगितले आहे. हा उघड उघड सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. हा तोच सौरव दास आहे, जो आंदोलनाच्या वेळी कोल्डकॉफी पित असताना हवा घालायला त्याने एक माणूस तैनात केला होता. 'आधी पोलिसांची परवानगी नसताना संसदेवर मोर्चा काढून आम्ही सरकारला जुमानत नाही,' हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता ते थेट सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देतायत. देशात अराजकाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. संसदेत पेपरफुटीच्या विरोधात कठोर तरतुदी असलेले विधेयक आणले आणि विद्यार्थ्यांचे भले होईल असा प्रयत्न केला. परंतु, हे कॉकरोच जनता पार्टीचे उद्दिष्ट नव्हतेच. देशाची स्थिती नेपाळ किंवा बांगलादेशसारखी करणे हेच यामागील कारण आहे. त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून देश पेटवायचा आहे.

जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाच्या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांची सुनावणी करताना, 'आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करू नका, त्यांना अटक केली असेल तर सोडून द्या,' असा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, 'कॉकरोच जनता पार्टी'ला (CJP) हे मान्य नाही. त्यांना ही धोक्याची घंटा वाटते आहे. हे संरक्षण फक्त विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नको, तर सराईत गुन्हेगारांनाही हवे, असा हट्ट त्यांनी धरला आहे. आंदोलनात सामील होण्यापूर्वी ज्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे, त्यांचीही सुटका व्हावी अशी सीजेपीची मागणी आहे. खुन, दरोडा, ड्रग्ज, बलात्कारी आदी गुन्ह्यात गुंतलेले २,८७३ सराईत गुन्हेगार आंदोलनात सामील झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी उघड केली आहे. त्यांनाही सरकारने हात लावू नये असा झुरळांचा हट्ट आहे. हट्ट पुरवला नाही तर पुन्हा आंदोलन सुरू करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे, 'जय भीम'च्या घोषणा द्यायच्या आणि घटनेवरच बुलडोझर चालवण्याचे काम करायचे, असा हा प्रकार आहे. सीजेपीचा सौरभ दास याने काल त्याच्या 'एक्स' (X) हँडलवरून एक सविस्तर पोस्ट टाकली आहे, त्यात हेच म्हटले आहे. न्यायालयाची शिकवणी घेण्याचा इरादा यात स्पष्ट दिसतो. 'सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय वापर होऊ नये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा शस्त्रासारखा वापर केला जाऊ नये,' अशी आणखी एक पोस्ट त्याने टाकली आहे. हे त्याने कॅमेऱ्यासमोरही सांगितले आहे. हा उघड उघड सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. हा तोच सौरव दास आहे, जो आंदोलनाच्या वेळी कोल्डकॉफी पित असताना हवा घालायला त्याने एक माणूस तैनात केला होता. 'आधी पोलिसांची परवानगी नसताना संसदेवर मोर्चा काढून आम्ही सरकारला जुमानत नाही,' हे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता ते थेट सर्वोच्च न्यायालयाला आव्हान देतायत. देशात अराजकाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. संसदेत पेपरफुटीच्या विरोधात कठोर तरतुदी असलेले विधेयक आणले आणि विद्यार्थ्यांचे भले होईल असा प्रयत्न केला. परंतु, हे कॉकरोच जनता पार्टीचे उद्दिष्ट नव्हतेच. देशाची स्थिती नेपाळ किंवा बांगलादेशसारखी करणे हेच यामागील कारण आहे. त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणावरून देश पेटवायचा आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka