Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संतापजनक! जुन्नरमध्ये १० वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या

संतापजनक! जुन्नरमध्ये १० वर्षांच्या चिमुकलीची अत्याचारानंतर हत्या

घराशेजारील संशयित तरुणाला अटक

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. १० वर्षांची चिमुकली बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान ही घटना घडली. घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत मुलीला सायकलवरून उसाच्या शेताच्या परिसरात नेल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे. मुलगी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांकडे ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळाली आणि संशयिताला ताब्यात घेण्यात आले.

सायबर गुन्ह्यासाठी ४५०० सीम कार्ड; चीन पाकिस्तान कनेक्शन

उड्डाणाच्या वेळी वेग घटला, टेल स्ट्राइक, टायर फुटले… काय घडले म्युनिक विमानतळावर?

कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; नऊ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू

चाकणचे खड्डे बुजणार; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश

या घटनेने पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले असून, विविध तपास यंत्रणांना कामाला लावण्यात आले आहे. पोलिसांकडून पुरावे आणि घटनाक्रमाची पडताळणी केली जात आहे. आरोपीविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka