Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सौदीकडून भारताला तेलपुरवठा घटण्याची शक्यता

सौदीकडून भारताला तेलपुरवठा घटण्याची शक्यता

NEWS डंका 1 month ago

पेट्रोल-डिझेलच्या दरांवर परिणामाची चिंता

सौदी अरेबियाकडून भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे. सौदी अरेबियातून लाल समुद्रापर्यंत जाणाऱ्या सुमारे १,२०० किलोमीटर लांबीच्या 'ईस्ट-वेस्ट पाइपलाइन'वर मागील आठवड्यात ड्रोन हल्ले झाले.

या हल्ल्यांमध्ये पाइपलाइनचे नुकसान झाल्यानंतर सौदी अराम्कोने पुढील सूचना मिळेपर्यंत भारताला होणारा तेलपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीमध्ये सौदी अराम्कोचा वाटा जवळपास ९ टक्के आहे. त्यामुळे या निर्णयामुळे भारताच्या तेल आयातीवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. सध्या इराण-अमेरिका युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलवाहतूकही बंद असल्याने सौदी अरेबियाच्या यान्बू बंदरातून लाल समुद्रमार्गे तेलाची वाहतूक केली जात होती. मात्र, पाइपलाइनचे नुकसान झाल्याने या पर्यायी मार्गालाही अडथळा निर्माण झाला आहे.

आयआयटी मुंबईत विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर आंदोलन

इस्रायलला माहिती दिल्याच्या आरोपात इराणी नागरिकाला फाशी

सौदी अराम्कोकडून पुरवठा थांबवल्याने भारतात लगेच कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे तेलशुद्धीकरण कंपन्यांचे म्हणणे आहे. भारतीय कंपन्यांना इतर देशांकडून कच्चे तेल खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, पर्यायी स्रोतांकडून तेल आणताना वाहतूक खर्च अधिक येणार असल्याने कंपन्यांच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्याचवेळी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल १०८ डॉलरपर्यंत पोहोचला होता. सौदी अराम्कोचा पुरवठा खंडित झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. तेल आयात महागल्याने कंपन्यांचा खर्च वाढू शकतो आणि त्याचा परिणाम वाहतूक तसेच उत्पादन क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे. परिणामी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबतही चिंता वाढली आहे. मात्र, सौदीकडील पुरवठा किती काळ खंडित राहतो आणि भारत पर्यायी स्रोतांकडून किती प्रमाणात तेल मिळवतो, यावर पुढील परिणाम अवलंबून असणार आहेत. त्यामुळे सौदी अराम्कोचा तेलपुरवठा कधी पूर्ववत होतो आणि जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर कोणत्या पातळीवर स्थिरावतात, याकडे भारताचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka