Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेत बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना मेडल

संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेत बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना मेडल

NEWS डंका 3 weeks ago

डॅग हॅमरशोल्ड पुरस्कार होणार प्रदान

संयुक्त राष्ट्र (UN) आंतरराष्ट्रीय शांतता सैनिक दिनानिमित्त शुक्रवार, २९ मे रोजी भारताच्या दोन शूर जवानांना मरणोत्तर सन्मानित करणार आहे. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणारे भारतीय शांतता सैनिक हवालदार हरभजन सिंह आणि नायब सुभेदार सुजीत कुमार प्रधान यांना संयुक्त राष्ट्रांकडून प्रतिष्ठेचे 'डॅग हॅमरशोल्ड मेडल' प्रदान करण्यात येणार आहे.

हा सन्मान संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एन्टोनियो गुटेरस यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. या दोन्ही भारतीय जवानांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये कार्यरत असताना आपले प्राण गमावले होते.

भारत अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये सक्रिय भूमिका बजावत असून जगातील सर्वात मोठ्या सैनिक योगदान देणाऱ्या देशांपैकी एक मानला जातो. हवालदार हरभजन सिंह यांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो येथे संयुक्त राष्ट्रांच्या स्थिरीकरण मोहिमेअंतर्गत (MONUSCO) सेवा बजावली होती. तर नायब सुभेदार सुजीत कुमार प्रधान हे दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये तैनात होते. दोन्ही जवानांनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.

'डॅग हॅमरशोल्ड मेडल' हा संयुक्त राष्ट्रांचा एक प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. मिशनदरम्यान सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शांतता सैनिकांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जातो. या पुरस्काराला संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव डॅग हॅमरशोल्ड यांचे नाव देण्यात आले आहे. याचवेळी भारताच्या मेजर अभिलाषा बराक यांनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळणार आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस त्यांना वर्ष २०२५ साठीचा 'मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करणार आहेत. महिलांचे सक्षमीकरण आणि जेंडर संवेदनशीलतेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान दिला जात आहे.

मेजर अभिलाषा बराक यांनी लेबनॉन येथे संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम दलासोबत (UNIFIL) काम करताना महिलांचा सहभाग वाढवणे, स्थानिक समुदायांशी संवाद मजबूत करणे आणि जेंडर जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या कार्याचे संयुक्त राष्ट्र स्तरावर विशेष कौतुक करण्यात आले आहे.

वादळी पावसामुळे बेतवा नदीवरील बांधकामाधीन पूल कोसळला; ६ मजुरांचा मृत्यू

तेलवाहू जहाजाने ओलांडली होर्मुझ सामुद्रधुनी; ३ जूनला विशाखापट्टणममध्ये पोहचणार

नाशिकनंतर आता कॉर्पोरेट जिहाद नरिमन पॉईंटला! स्टेट बँकेत हिंदू महिला टार्गेट

एका बाजूला भारतीय जवानांच्या बलिदानाला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळत असताना, दुसऱ्या बाजूला भारतीय महिला अधिकाऱ्याच्या कामगिरीमुळे देशाच्या लष्करी नेतृत्वाला आणि क्षमतेला नवी ओळख मिळत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भारताचे योगदान अनेक दशकांपासून महत्त्वपूर्ण राहिले आहे. हजारो भारतीय सैनिकांनी विविध संघर्षग्रस्त भागांमध्ये शांतता प्रस्थापित करणे, मानवतावादी मदत पुरवणे आणि नागरिकांचे संरक्षण करणे यासाठी सेवा बजावली आहे. या मोहिमांमध्ये अनेक भारतीय जवानांनी आपल्या प्राणांचेही बलिदान दिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka