Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिवीगाळ करणाऱ्यांना माफ करा, मोदींचे आवाहन

शिवीगाळ करणाऱ्यांना माफ करा, मोदींचे आवाहन

NEWS डंका 3 weeks ago

दिशाभूल झालेल्याना मार्गदर्शन करू, भारतासाठी एकत्र काम करू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजात वाढत चाललेल्या कटु भाषा आणि द्वेषाच्या वातावरणाबाबत महत्त्वाचा संदेश देत, 'शिवीगाळ करून कोणतीही समस्या सुटत नाही.

दिशाभूल झालेल्यांना योग्य मार्ग दाखवूया आणि भारतासाठी एकत्र काम करूया,' असे आवाहन केले. त्यांनी समाजाने संयम, संवाद आणि क्षमाशीलतेचा मार्ग स्वीकारण्याची गरजही अधोरेखित केली.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात अलीकडील आंदोलनांदरम्यान काही तरुणांकडून त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या दिवंगत आईबाबत आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा उल्लेख केला. मात्र, अशा वर्तनाला प्रत्युत्तर म्हणून सूडाची भावना न बाळगता त्या तरुणांना योग्य दिशा देण्याची जबाबदारी समाजाची असल्याचे त्यांनी सांगितले. 'हे आपल्या देशातीलच मुले आहेत. त्यांनी चूक केली असेल, पण त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करणे हा उपाय नाही. त्यांना समजावून सांगणे, त्यांना योग्य मार्गावर आणणे आणि त्यांची ऊर्जा राष्ट्रनिर्माणासाठी वापरली जावी, यासाठी प्रयत्न करणे हीच खरी जबाबदारी आहे,' असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी समाजातील प्रत्येक घटकाला परस्परांबद्दल आदर राखण्याचे आवाहन करताना, 'शिवीगाळ, द्वेष आणि कटुता यामुळे कोणत्याही प्रश्नाचे समाधान होत नाही. आपण सर्वांनी मिळून दिशाभूल झालेल्यांना मार्गदर्शन करूया, एकत्र येऊया आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी काम करूया,' असेही त्यांनी नमूद केले.

वंदे भारत ठरली लाईफलाईन; प्रथमच जिवंत हृदयाची वाहतूक

'आप' नेता ताहीर हुसेनला अंकित शर्मा हत्येप्रकरणी जन्मठेप

कोकण रेल्वेचे तिकीट नाही…तीन गाड्या, चाकरमानी वाऱ्यावर; बेलापूरमध्ये उपोषण

पश्चिम बंगालमध्ये जैशच्या संशयित दहशतवाद्याला अटक

त्यांच्या या संदेशाकडे अलीकडील विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण राजकीय प्रतिक्रिया म्हणून पाहिले जात आहे. काही आंदोलनांदरम्यान पंतप्रधानांविरोधात झालेल्या घोषणाबाजी आणि आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर त्यांनी कठोर कारवाईची भूमिका न घेता क्षमा, संवाद आणि सकारात्मक मार्गदर्शनाचा संदेश दिला आहे. या संदेशाच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी युवकांना आपल्या चुका सुधारून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. 'आपली स्वप्ने पूर्ण करा, चुका विसरून पुढे चला आणि भारतासाठी एकत्र काम करूया,' असे ते म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka