Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करणारे तीन शूटर्स अटकेत

शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या करणारे तीन शूटर्स अटकेत

NEWS डंका 2 weeks ago

उत्तर प्रदेशात केली अटकेची कारवाई

श्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय सहकारी आणि वैयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) उत्तर प्रदेशातून तीन शार्प शूटर्सना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर कोलकात्यात आणण्यात आले असून, भवानी भवन येथे त्यांची रात्रभर चौकशी करण्यात आली. यातील एक आरोपी उत्तर प्रदेशातील अयोध्येतून अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

चंद्रनाथ रथ यांची ६ मे च्या रात्री कोलकाता विमानतळापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यमग्राममधील दोहरिया लेन परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खळबळजनक घटनेनंतर बंगाल पोलिसांनी अनेक बाजूंनी तपास सुरू केला होता. तांत्रिक सर्व्हेलन्स आणि कॉल डिटेल्सच्या आधारे SIT ला उत्तर प्रदेश कनेक्शनचा सुगावा लागला, त्यानंतर छापेमारी करून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिस तपासात असे समोर आले आहे की, हत्येसाठी वापरण्यात आलेली बाइक आणि हल्लेखोरांचे संपर्क उत्तर प्रदेशाशी संबंधित असू शकतात. प्राथमिक तपासात पोलिसांना हा व्यावसायिक सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचा संशय असून, आरोपींना हत्या करण्यासाठी भाड्याने आणण्यात आले होते. आता तपास यंत्रणा या शार्प शूटर्सना कोणी पाठवले आणि चंद्रनाथ रथ यांना लक्ष्य करण्यामागील खरा कट काय होता, याचा शोध घेत आहेत.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या मते, हल्लेखोरांनी अवघ्या ५० सेकंदांत ही संपूर्ण कारवाई केली. सिल्व्हर रंगाची हॅचबॅक कार त्यांच्या वाहनासमोर आडवी लावण्यात आली, त्यानंतर बाइकवर आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. हत्येसाठी वापरलेल्या कारची नंबर प्लेट बनावट असल्याचेही समोर आले आहे. सिलीगुडीतील एका व्यक्तीने OLX वर आपली कार विक्रीसाठी जाहिरात दिली होती. आरोपींनी त्याच जाहिरातीतील फोटो वापरून वाहनाची माहिती मिळवली आणि बनावट नंबर प्लेट तयार केली, जेणेकरून तपास यंत्रणांची दिशाभूल करता येईल. पोलिसांनी सांगितले, 'हल्लेखोरांना गाडीत लक्ष्य नेमके कुठे बसले आहे याची माहिती होती. त्यामुळे त्यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि वेगाने हा गुन्हा अंजाम दिला.'

आयफोन 18 प्रो मॅक्स येतोय! काय असतील वैशिष्ट्ये?

हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामवर मुंबई इंडियन्सला केले अनफॉलो?

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती; सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी घसरला

'वर्क फ्रॉम होम स्वीकारा, पेट्रोल वाचवा, एक वर्ष सोने खरेदी करू नका'

चंद्रनाथ रथ यांची ओळख केवळ राजकीय सहाय्यक म्हणून मर्यादित नव्हती. ४१ वर्षीय चंद्रनाथ यांनी यापूर्वी भारतीय वायुदलात सेवा बजावली होती. त्यानंतर ते शुभेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी बनले. ते पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील चांदीपूर भागातील रहिवासी होते, जो सुवेंदु अधिकारी यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. सध्या अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींकडून सातत्याने चौकशी सुरू असून, ही हत्या राज्यांतर्गत कटाचा भाग होती की यामागे एखादे बाह्य गुन्हेगारी जाळे कार्यरत होते, याचा तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka