Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले!

श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाले!

NEWS डंका 3 weeks ago

श्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालांची मतमोजणी ४ मे रोजी सुरू झाली. २९४ सदस्यीय विधानसभेत भाजपाने २०० जागांचा टप्पा ओलांडला आहे. तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेला धक्का बसलेला आहे आणि पक्षाची घसरण स्पष्ट जाणवत आहे.

भाजपाने प्रथमच पश्चिम बंगालमध्ये हे घवघवीत यश मिळविले आहे. यानिमित्ताने श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आठवण ताजी होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचारादरम्यान जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन वारंवार दिले होते. त्यांच्या विचारांवरच पुढे भाजपाची पायाभरणी झाली होती. त्यामुळे मुखर्जी यांना भाजपाचे पितामह मानले जाते आणि त्यांचे स्वप्न आता साकार होत असल्याचे मानले जात आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीदरम्यान भाजप- टीएमसी कार्यकर्ते भिडले

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोईंची हार

विजय तामिळनाडूसाठी काही करू इच्छित होता…

विजय यांच्या समर्थकाने अफवा ऐकून गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न

श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे योगदान

पश्चिम बंगालमध्ये मिळालेले यश हे श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नाशी जोडले जात आहे. ते वकील, शिक्षणतज्ज्ञ आणि नेते होते आणि स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या सरकारमध्ये मंत्रीही होते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या क्षमतेचा विचार करून त्यांना उद्योग आणि पुरवठा मंत्री केले होते.

१९०१ साली कलकत्त्यात जन्मलेल्या मुखर्जी यांची ३३ व्या वर्षी कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी १९२९ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण मतभेदांमुळे १९३० मध्ये पक्ष सोडला.

जनसंघ ते भाजप

१९३९ मध्ये ते हिंदू महासभेत सामील झाले आणि १९४० मध्ये अध्यक्ष बनले. १९५१ मध्ये त्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली, ज्यातून पुढे भाजपाची निर्मिती झाली. मुखर्जी यांनी बंगालचा पाकिस्तानमध्ये समावेश होऊ नये यासाठी विभाजनविरोधात बाजू मांडली होती. २० जून १९४७ रोजी बंगाल विधानसभेत पश्चिम बंगाल राज्य निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला.

मोदी आणि शाह यांचे विधान

२७ एप्रिल रोजी बैरकपूर येथे झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यास राज्याच्या विकासाचे मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण केले जाईल. अमित शाह यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रचारादरम्यान म्हटले होते की ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भ्रष्टाचारामुळे विकास थांबला आहे. त्यांनी असेही सांगितले की भाजप सरकार आल्यास घुसखोरी पूर्णपणे थांबवली जाईल आणि राज्याची सांस्कृतिक ओळख पुन्हा जिवंत केली जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka