Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सीएसकेला मोठा धक्का; आयुष म्हात्रे संपूर्ण हंगामातून बाहेर

सीएसकेला मोठा धक्का; आयुष म्हात्रे संपूर्ण हंगामातून बाहेर

NEWS डंका 1 month ago

यपीएल २०२६ दरम्यान चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघातील युवा फलंदाज आयुष म्हात्रे हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे.

सीएसके व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, म्हात्रेला पूर्णपणे फिट होण्यासाठी ६ ते १२ आठवडे लागणार आहेत.

त्यामुळे त्याचा पुढील सामन्यांमध्ये सहभाग अशक्य झाला आहे.

१८ एप्रिल रोजी हैदराबादविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना म्हात्रेच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. खेळताना तो दोन वेळा मैदानावर उपचार घेताना दिसला आणि शेवटी फिजिओच्या मदतीने मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतरच्या स्कॅनमध्ये दुखापतीची तीव्रता स्पष्ट झाली.

या हंगामातील म्हात्रेची कामगिरी:

सध्या सीएसकेने ६ पैकी २ सामने गमावले असून गुणतालिकेत ८व्या स्थानावर आहे. म्हात्रेच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या फलंदाजीला मोठा धक्का बसणार आहे.

हेही वाचा :

सोनं-चांदी दरात मोठी घसरण; जागतिक दबावामुळे बाजार अस्थिर

शेअर बाजारात जोरदार उसळी; सेन्सेक्स ७५३ अंकांनी वधारला

भारतीय ऍथलेटिक्सवर 'अत्यंत उच्च डोपिंग जोखीम'चा ठपका

जर्मनीतील गुरुद्वारात संघर्ष; शस्त्रांसह ४० जण भिडले

यापूर्वीही सीएसकेला अनेक धक्के बसले आहेत — खलील अहमद दुखापतीमुळे बाहेर, महेंद्रसिंह धोनी अद्याप उपलब्ध नाहीत, तर नाथन एलिस आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्याही अनुपस्थितीचा फटका संघाला बसला आहे.

सीएसकेचे आगामी सामने:

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka