Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोनं-चांदी पुन्हा स्वस्त!

सोनं-चांदी पुन्हा स्वस्त!

NEWS डंका 2 weeks ago

सलग दुसऱ्या दिवशी दर घसरले

सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये घसरण झाली असून सराफा बाजारात तसेच मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज (MCX) वर सोन्या-चांदीचे दर नरमल्याचे चित्र दिसत आहे.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीच्या मिनिट्सकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून त्याच पार्श्वभूमीवर जागतिक बाजारात सावध व्यवहार सुरू आहेत. त्याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर झाला आहे.

आजच्या दरांनुसार, देशात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सुमारे ₹१,४६,१५०, तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१,३३,९८८ इतका आहे. एक किलो चांदीचा दर ₹२,३२,९३० इतका नोंदवला गेला आहे. हे दर जीएसटी, मेकिंग चार्ज आणि इतर स्थानिक शुल्क वगळून आहेत. त्यामुळे शहरानुसार आणि सराफानुसार अंतिम दरांमध्ये किंचित फरक असू शकतो.

पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्यात अस्त्र, ब्राह्मोसचे काय आहे महत्त्व?

गर्भवती असल्यामुळे टीसीएस धर्मांतरणातील मुख्य आरोपी निदा खानला जामीन

आजच्या घसरणीत सोन्याच्या दरात सुमारे ₹१,४०० प्रति १० ग्रॅम, तर चांदीच्या दरात तब्बल ₹४,३०० प्रति किलो घट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उच्च पातळीवर असलेल्या सोन्या-चांदीच्या किमती आता काहीशा खाली आल्या असून खरेदीदारांसाठी ही संधी मानली जात आहे.

बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन डॉलरची मजबुती, बाँड यिल्डमध्ये झालेली वाढ आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबतची अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यावर दबाव वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मोठे व्यवहार करण्याऐवजी प्रतीक्षेची भूमिका घेत आहेत. जागतिक बाजारातील या घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावरही स्पष्टपणे दिसून येत आहे.

तज्ज्ञांच्या मते, दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांनी दरातील प्रत्येक घसरण ही संधी म्हणून पाहावी. मात्र एकाच वेळी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक योग्य ठरेल. पुढील काही दिवसांत अमेरिकेच्या फेडच्या बैठकीचे मिनिट्स, डॉलरची हालचाल आणि जागतिक आर्थिक घडामोडी यावर सोन्या-चांदीच्या किमतींची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईने निर्णय न घेता बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka