Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण

NEWS डंका 7 months ago

डॉलर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून विक्रमी पातळीवर पोहोचलेल्या सोन्या-चांदीच्या दरांना बुधवारी, २ सप्टेंबर रोजी मोठा धक्का बसला. देशांतर्गत वायदा बाजारात म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण झाली.

सोन्याच्या दरात एक टक्क्याहून अधिक, तर चांदीच्या दरातही सुमारे दीड टक्क्यापर्यंत घसरण नोंदवण्यात आली. त्यामुळे विक्रमी दराने सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

MCX वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा सुमारे १,५०,१२३ रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीचा सप्टेंबर वायदा सुमारे २,३२,१९७ रुपये प्रति किलो या पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या काही काळात सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असताना अचानक झालेल्या या घसरणीमुळे बाजारातील समीकरण बदलले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींचा देशांतर्गत सराफा बाजारावर थेट परिणाम होत असल्याने आगामी काळातही दरांमध्ये मोठी चढ-उताराची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लाल किल्ल्याजवळील स्फोटासाठी पैसे दिल्याचे भासवून ३० लाख लुबाडले

मध्यपूर्वेतील युद्धाची धग शेअर बाजाराला; सेन्सेक्स ४७२ अंकांनी घसरला

सोन्याच्या दरातील या घसरणीमागे अनेक आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. तेल महागल्याने जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी अमेरिकी डॉलर मजबूत झाला असून, अमेरिकन ट्रेझरी बाँडचे उत्पन्नही वाढले आहे. या परिस्थितीत सोन्यासारख्या व्याज न देणाऱ्या मालमत्तेची मागणी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याचा भाव तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला असून, सलग चौथ्या सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आगामी व्याजदर निर्णयाकडे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. महागाईचा दबाव वाढल्यास व्याजदरवाढीची शक्यता बळावू शकते, अशी बाजाराची धारणा आहे. आता अमेरिकेतील रोजगार आणि आर्थिक स्थितीशी संबंधित आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दराला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सोने-चांदीच्या बाजारात सावधगिरीचे वातावरण असून, गुंतवणूकदारांचे लक्ष पुढील काही दिवसांतील जागतिक घडामोडींवर केंद्रित झाले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka