Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोफी एक्लेस्टोनचा विश्वविक्रम!

सोफी एक्लेस्टोनचा विश्वविक्रम!

हिला टी-20 विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर ४० धावांनी मात करत पाचव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात इंग्लंडची स्टार फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन हिने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला.

एक्लेस्टोनने चार षटकांत केवळ २१ धावा देत एक बळी घेतला. क्लो ट्रायॉनला शानदार चेंडूवर बोल्ड करत तिने महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारी फिरकी गोलंदाज होण्याचा मान मिळवला.

तिच्या नावावर आता ३८ बळी जमा झाले असून तिने न्यूझीलंडची कर्णधार अमेलिया केर (३७ बळी) हिला मागे टाकले आहे. या यादीत वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलर (३३ बळी) तिसऱ्या स्थानावर आहे.

चालू विश्वचषकात एक्लेस्टोनने आतापर्यंत ६ सामन्यांत ९ बळी घेतले असून तिचा इकॉनॉमी रेट अवघा ५.७९ इतका प्रभावी राहिला आहे. मधल्या षटकांमध्ये तिच्या अचूक आणि किफायतशीर गोलंदाजीमुळे इंग्लंडला सातत्याने मोठा फायदा झाला.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ५ बाद १६९ धावा केल्या. कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट हिने ४७ चेंडूत ७५ धावांची झंझावाती खेळी करत संघाच्या डावाला भक्कम आधार दिला. तिच्या खेळीत ११ चौकार आणि १ षटकार होता. हीदर नाईट हिनेही ५८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

१७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ८ बाद १२९ धावांवर आटोपला. ताझमिन ब्रिट्स हिने सर्वाधिक ५१ धावा केल्या. इंग्लंडकडून लॉरेन बेल आणि चार्ली डीन यांनी प्रत्येकी दोन बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka