Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्वातंत्र्यदिनासाठी दिल्लीत हाय अलर्ट, १९ दहशतावाद्यांचे पोस्टर्स जारी

स्वातंत्र्यदिनासाठी दिल्लीत हाय अलर्ट, १९ दहशतावाद्यांचे पोस्टर्स जारी

संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवली

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर संभाव्य दहशतवादी धोका लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे.

पोलिसांनी १९ वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर प्रसिद्ध केले असून, ही पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावण्यास सुरुवात केली आहे. एनडीटीव्हीने यासंदार्भातील वृत्त दिले आहे.

या दहशतवाद्यांचा संबंध इंडियन मुजाहिदीन, अल-कायदा आणि खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. देशातील विविध बॉम्बस्फोट आणि दहशतवादी घटनांमध्ये त्यांची नावे समोर आली आहेत. सुरक्षा यंत्रणा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून, संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या पोस्टरमध्ये इंडियन मुजाहिदीनशी संबंधित पाच वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामध्ये कर्नाटकातील भटकळ येथील इकबाल भटकळ आणि रियाज भटकळ, बंगळुरूतील जुनैद अहमद, उत्तर प्रदेशातील आझमगड येथील मोहम्मद खालिद आणि महाराष्ट्रातील पुणे येथील मोहसिन चौधरी यांचा समावेश आहे.

दुसऱ्या गटात अल-कायदाशी संबंधित सहा वॉन्टेड दहशतवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यामध्ये संभल येथील मोहम्मद शरजील अख्तर, दिल्लीतील सीलमपूर येथील मोहम्मद रेहान, झारखंडच्या छत्रा येथील अबू सुफियान, जमशेदपूर येथील सैयद मोहम्मद आर्शियान, बंगळुरूतील मोहम्मद शाहीद फैजल उर्फ उस्ताद आणि हैदराबाद येथील मोहम्मद उमर यांचा समावेश आहे.

तिसऱ्या गटात खलिस्तानी दहशतवादी संघटनांशी संबंधित आठ वॉन्टेड दहशतवाद्यांचा समावेश आहे. यामध्ये बब्बर खालसा इंटरनॅशनलशी संबंधित वाधवा सिंह बब्बर, पुरुषोत्तम सिंह पम्मा आणि हरविंदर सिंह रिंदा, तसेच गुरमीत सिंह बग्गा आणि भूपेंद्र सिंह भिंडा यांचा समावेश आहे. याशिवाय खलिस्तान झिंदाबाद फोर्सशी संबंधित रणजीत सिंह आणि परमजीत सिंह पम्मा, तर खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित अर्शदीप सिंह डाला याचाही या यादीत समावेश आहे.

इराणच्या धमकीने ट्रम्प सतर्क; केटरिंग ट्रक ठरला 'सीक्रेट एस्केप प्लॅन'

धारावीत आई-वडिलांनीच दीड वर्षांच्या बाळाला १ लाख ५ हजारांत विकले!

ब्लिंकइटच्या गोदामात झुरळेच झुरळे; परवाना रद्द

अमुलच्या बनावट दुध पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रेल्वे स्थानके, बस स्थानके, मेट्रो स्थानके, बाजारपेठा, ऐतिहासिक स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी अतिरिक्त पोलिस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी वाढवण्यात आली असून, वाहनांची तपासणी आणि संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विशेष मोहीमही राबवली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka